राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेच्या तज्ञ शिक्षकांची कार्यशाळा संपन्न

कार्यशाळेत देशभरातील १४१ तज्ञ शिक्षकांची उपस्थिती

खारघर : देशभरात दिव्यांगांना शिक्षण देणाऱ्या संस्थेच्या तज्ञ व्यक्तींसाठी ४ ते ६ सप्टेंबर या कालावधीत कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात भारतातील १४१ विशेष शैक्षणिक क्षेत्रातील तज्ञ सहभागी झाले होते. सदर कार्यशाळेचे आयोजन खारघर येथील राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांग सशक्तीकरण संस्थेच्या वतीने करण्यात आले होते.  

या कार्यशाळेचे  उद्‌घाटन मुंबई एसएनडीटी विद्यापीठ विशेष शिक्षण विभागाचे विभाग प्रमुख डॉ. सुजाता भान यांच्या हस्ते पार पडले. यावेळी  नवी मुंबई महापालिका अपंग शिक्षण-प्रशिक्षण सेवा सुविधा केंद्राचे मुख्याध्यापक दीपक नवघरे, व्याखाते डॉ. वसीम, आदि उपस्थित होते. सदर कार्यशाळा भारतीय पुनर्वसन परिषद यांच्या मान्यतेने घेण्यात आली होती.

केंद्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या वतीने देशभरात जवळपास १२० संस्था कार्यरत आहे. देशभरातील विविध   राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांगजन सशक्तीकरण संस्थेत दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी ज्ञानदानाचे कार्य करणाऱ्या विशेष तज्ञ व्यक्तींची कार्यशाळा खारघर मध्ये पार पडली. या कार्यशाळेत विविध विषयानुसार मार्गदर्शन करण्यात आले. तसेच कार्यशाळेत उपस्थित करण्यात आलेल्या शंकांचे  तज्ञांनी निरसन केले. डॉ सुजाता भान यांनी सदर उपक्रमाचे कौतुक करुन प्रशिक्षण देणाऱ्या सर्व तज्ञ शिक्षकांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

प्रशिक्षण कार्यक्रम खारघर येथील राष्ट्रीय बौध्दिक दिव्यांगजन सशक्तीकरणचे प्रभारी डॉ. रवी प्रकाश सिंग  यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. तर संपूर्ण कार्यक्रमाचे समन्वयन विशेष व्याख्याता ज्योती खरात यांनी केले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘अध्यापनातले दीपस्तंभ' या विषयावर प्रा. दवणे यांचा शिक्षकांशी दिलखुलास संवाद