पत्रकाराची मुलगी बनली डॉवटर!

पत्रकारांकडून डॉ. जिज्ञासा कडू हिच्यावर कौतुकाचा वर्षाव

पनवेल : दैनिक ‘वादळवारा'चे संपादक विजय कडू यांची सुकन्या जिज्ञासा कडू हिने एमबीबीएस परीक्षेत प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होऊन इंटर्नशीप पूर्ण केली आहे. सदर बाब अभिमानास्पद असून ‘जिज्ञासा'चे यश भावी डॉक्टरांसाठी प्रेरणादायी असल्याचे मत ‘किल्ले रायगड'चे संपादक प्रमोद वालेकर यांनी पनवेल येथे व्यवत केले. पनवेल मधील पत्रकारांनी पत्रकाराच्या मुलीच्या यशाबाबत अभिष्टचिंतनाचा कार्यक्रम आयोजित केला होता, त्यावेळी ते बोलत होते.

पत्रकारिता क्षेत्र इतर क्षेत्रांमध्ये निराळेच क्षेत्र आहे. आजच्या परिस्थितीत डॉक्टर होण्यासाठी पैसा हाच महत्वाचा भाग असून पत्रकारिता करुन आपल्या मुलांना डॉक्टर करणे तारेवरची कसरत आहे. गरीब कुटुंबात जन्मलेले विजय कडू यांनी आर्थिक परिस्थितीवर मात करत मुलांना उच्च शिक्षण देण्याचे काम केले. त्यांच्या मुलांनीही त्यांच्या अपेक्षा प्रत्यक्षात उतरवून समाजात मानसन्मान मिळविला आहे. मुलगी जिज्ञासा हिला नुकतीच एमजीएम कॉलेज संभाजीनगर येथे केंद्रीय राज्यमंत्री डॉ. भागवत कराड, ‘एमजीएम संस्था'चे चेअरमन डॉ.कमलकिशोर कदम, डॉ. सुधीर कदम, डीन डॉक्टर नरशेट्टी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडलेल्या सोहळ्यात पदवी प्रदान करण्यात आली.

डॉक्टर जिज्ञासा कडू लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होती. इयत्ता १० वी बोर्डाच्या परीक्षेत तिने ९५ टक्के गुण प्राप्त केले होते. जिज्ञासा हिने कामोठे येथील एम.जी.एम. कॉलेजमधून एमबीबीएस पदवी प्राप्त केली. डॉ. जिज्ञासा हिचा पोस्ट ग्रॅज्युएशन करण्याचा विचार असल्याचेही तिने या कार्यक्रमादरम्यान सांगितले. यावेळी तिने आपली पदवी आई-वडील आणि आजोबा दा.चा.कडू गुरुजी यांना समर्पित करीत असल्याचेही सांगितले.

जिज्ञासा हिच्या यशाबद्दल तिचे अभिनंदन आणि शुभेच्छा देण्यासाठी जेष्ठ पत्रकार प्रमोद वालेकर, संजय कदम, निलेश सोनावणे, रत्नाकर पाटील, प्रकाश म्हात्रे, अनिल भोळे, अनिल कुरघोडे, हरेश साठे, प्रविण मोहोकर, राज भंडारी, साहिल रेळेकर, मयूर तांबडे, रविंद्र गायकवाड, चंद्रकांत शिर्के, अनिल राय, विशाल सावंत, असीम शेख, सुभाष वाघपंजे, शंकर वायदंडे, आदि पत्रकारांसह ॲड. परेश गायकवाड, भैरवी कडू-गायकवाड उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिका आयोजित विचारमाला मंथन व्याख्यानमाला