जालना लाठीचार्ज घटनाः वाशीत महाविकास आघाडीतर्फे निषेध 

जोडो मारो आंदोलनात महाविकास आघाडीचे पदाधिकारी-कार्यकर्ते सहभागी

नवी मुंबई : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटा गांव याठिकाणी उपोषण आंदोलनादरम्यान पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज आणि अन्यायाविरोधात राज्यात सर्वत्र त्याचे पडसाद उमटून सरकार आणि पोलिसांविरोधात निदर्शने सुरु आहेत. नवी मुंबईत देखील ६ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने वाशीतील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला जोडे मारो मारुन आपला निषेध करण्यात आला.

मराठा समाजाला आरक्षण मिळावा म्हणून जालना मधील आंतरवाली सराटा गांव येथे मनोज जरांगे उपोषणाला बसले आहेत. जोपर्यंत मराठा आरक्षणाचा अध्यादेश निघत नाही तोपर्यंत उपोषण करण्याचा निर्धार मनोज जरांगे यांनी केला असून सरकारला त्यांचे उपोषण मागे घेण्यात अपयश आलेले आहे. १ सप्टेंबर रोजी या आंदोलनावेळी पोलिसांकडून झालेल्या लाठीचार्ज आणि अन्यायाचा आता राज्यभर निषेध केला जात आहे. त्याअनुषंगाने ६ सप्टेंबर रोजी महाविकास आघाडीच्या वतीने वाशीतील शिवाजी महाराज चौक येथे राज्य सरकारविरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी आंदोलनकर्त्यांनी उपमुख्यमंत्री तथा देवेंद्र फडणवीस यांच्या प्रतिमेला जोडे मारुन त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

या आंदोलनाप्रसंगी आमदार शशिकांत शिंदे, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस तथा नवी मुंबई निरीक्षक प्रशांत पाटील, शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे)े जिल्हाप्रमुख वि्ील मोरे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अनिल कौशीक, माजी विरोधी पक्षनेता दिलीप घोडेकर, शिवसेना महिला जिल्हा संघटक सौ. रंजना शिंत्रे, काँग्रेस प्रववते नासीर हुसेन, माजी नगरसेवक अतुल कुळकर्णी, संदीप सुतार, चंद्रकांत पाटील, विक्रम (राजू) शिंदे, सौ. आरती शिंदे, सौ. सलुजा सुतार, डॉ. प्राजवता मोंडकर, सौ. कविता चंद्रकांत पाटील, विभागप्रमुख समीर बागवान, विशाल विचारे, काँग्रेस प्रवक्ता नासिर हुसेन, सचिन नाईक, यांच्यासह महाविकास आघाडीचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पत्रकाराची मुलगी बनली डॉवटर!