पर्यावरणविषयक लघुचित्रपट महोत्सवास मिळाला शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद  

ठाणे महानगरपालिका आणि पर्यावरण दक्षता मंडळातर्फे आयोजन
 
ठाणे : निसर्ग आणि पर्यावरणातील जैविक व अजैविक संसाधनाची माहिती शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच सर्वसामान्य नागरिकांना व्हावी. तसेच निसर्ग आणि पर्यावरणाच्या ऱ्हासाबद्दल संवेदनशील बनवून पर्यावरणाच्या विविध समस्यांमध्ये विद्यार्थ्यांचा हातभार लागावा यासाठी आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिनाचे औचित्य साधून ठाणे महानगरपालिका व पर्यावरण दक्षता मंडळ यांचेद्वारे लघुचित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या महोत्सवास शालेय विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

 7 सप्टेंबर हा आंतरराष्ट्रीय स्वच्छ हवा दिवस ठाणे महानगरपालिकेच्यावतीने साजरा कररण्यात येतो. Together for clean Air ही या वर्षीची संकल्पनेस अनुसरून दिनांक 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर 2023 या कालावधीत पार पडलेल्या लघुचित्रपट महोत्सवास शालेय विद्यार्थी, शिक्षक तसेच नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दररोज दोन सत्रात आयोजित केलेल्या या महोत्सवात पर्यावरणाशी निगडीत अनेकविध लघुचित्रपट दाखविण्यात आले. यामध्ये तलावांचे संवर्धन, वनीकरण (देवराई), वन्य प्राण्याच्या अधिवासाचे संरक्षण, सिंगल यूज प्लास्टिक बंदी, कापडी पिशव्यांचा वापर, हवा प्रदूषण, वातावरण बदल, नद्यांचे संवर्धन, इत्यादी अनेक विषयांवर आधारित मराठी, इंग्रजी व हिंदी भाषेतील लघुपटांचा समावेश होता. प्रत्येक सत्रात विविध शाळांचे 6 हजाराहून अधिक विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते. यावेळी उपस्थित विद्यार्थी व शिक्षकांना माझी वसुंधरा अभियानातंर्गत हरित शपथ देण्यात आली.

वाढत जाणारे हवा प्रदूषण नियंत्रणाकरिता ठाणे महानगरपालिका करीत असलेले प्रयत्न तसेच त्यामध्ये ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेचा सहभाग याबाबत परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी कार्यक्रमाच्या शुभारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सतिश प्रधान ज्ञानसाधना महाविद्यालयाचे प्राचार्य गणेश भगुरे, महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे ठाणे विभागाचे उपप्रादेशिक अधिकारी शकील शेख, ठाणे महापालिकेच्या मुख्य पर्यावरण अधिकारी मनिषा प्रधान , पर्यावरण दक्षता मंडळाचे अध्यक्ष विद्याधर वालावलकर व एन्व्हायरो व्हिजील संस्थेचे अध्यक्ष विकास हजिरनीस आदी उपस्थित होते. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाच्या कॉन्फरन्स हॉलमध्ये आढावा बैठकीचे आयोजन