जालना मधील घटनेच्या निषेधार्थ वाशी मध्ये आंदोलन

शिवाजी चौकात ‘एक मराठा, लाख मराठा' घोषणाबाजी

वाशी : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे उपोषण सुरु होते. मात्र, १ सप्टेंबर रोजी सायंकाळी मराठा समाजातील उपोषणकर्त्यांवर पोलिसांकडून अमानुष लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे पडसाद राज्यभर उमटत असून, निषेध व्यक्त केला जात आहे.

या घटनेचा नवी मुंबई मध्ये ‘मराठा क्रांती मोर्चा' तर्फे वाशी मधील छत्रपती शिवाजी महाराज चौकात ‘एक मराठा, लाख मराठा' अशी घोषणा देत सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी पोलीस अधिकारी तुषार जोशी यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.

‘राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी'चे अध्यक्ष शरद पवार, राज्य विधानसभा विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, राज्य विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना ‘मराठा' शब्द उच्चारण्याचा काहीही अधिकार नाही, अशी टिका यावेळी ‘मराठा क्रांती मोर्चा'चे समन्वयक अंकुश कदम यांनी केली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 वाशी, तुर्भे येथे ‘अनधिकृत होर्डिंग'चे पेव