‘झाडे वाचवा, झाडे जगवा'

अर्जुन हौसिंग सोसायटी तर्फे सार्वजनिक गणेशोत्सव मध्ये पर्यावरण पूरक संदेश

नवी मुंबई : घणसोली सेक्टर - ४ मधील अर्जुन को. ऑप. हौसिंग सोसायटी तर्फे गेल्या २२ वर्षांपासून सार्वजनिक श्रीगणेशोत्सव साजरा करण्यात येत असून, यंदा २३व्या वर्षी सोसायटी द्वारे सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मध्ये ‘झाडे वाचवा, झाडे जगवा', असा पर्यावरण पूरक संदेश देण्यात आला आहे.

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मध्ये अर्जुन को. ऑप. हौसिंग सोसायटी तर्फे दरवर्षी विविध सामाजिक, विधायक कार्यक्रम, उत्सव आयोजित करण्यात येतात. तसेच सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मध्ये सुबक, छान सजावट आणि गणेशमुर्ती यामुळे ‘सोसायटी'ला नवी मुंबई महापालिका द्वारे सलग दोन वर्षे पारितोषिक मिळाले आहे. तसेच दैनिक लोकसत्ता आयोजित स्पर्धेत ‘सुबक गणेशमुर्ती'चे पारितोषिक देखील ‘सोसायटी'ने संपादन केले आहे.

यंदा अर्जुन को. ऑप. हौसिंग सोसायटी द्वारे सार्वजनिक श्रीगणेशोत्सव-२०२३ मध्ये पर्यावरण पूरक सजावट करण्यात आली आहे. या सजावटी द्वारे ‘झाडे वाचवा, झाडे जगवा', असा पर्यावरण पूरक संदेश देण्यात आला आहे. या सजावटीत सुबक, सुंदर श्रीगणेशमुर्ती प्रतिष्ठापित करण्यात आली आहे, अशी माहिती ‘अर्जुन को. ऑप. हौसिंग सोसायटी'चे अध्यक्ष विश्वास ताराचंद्र कांबळे यांनी दिली.

यावर्षी सार्वजनिक श्रीगणेशोत्सवात पर्यावरण पूरक सजावट करण्यासाठी सोसायटी मधील तरुण कार्यकर्ते अक्षय निकम, जयेश कांबळे, प्रिन्स कावत्रा, अमर चौधरी, आकाश चोपडे, रोहित मानकर, आरुष चाचर, जयेश पटेल यांनी खुप मेहनत घ्ोतली असून, सजावट संकल्पना आणि मार्गदर्शन ‘सोसायटी'चे सचिव दीपक बोडके यांचे आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 १ ऑक्टोबर रोजी ‘स्वच्छतेसाठी एक तारीख- एक तास' उपक्रम