डॉक्टरांकडून शिबिरार्थींना योग्य मार्गदर्शन

खारघर मध्ये मोफत आरोग्य, डोळे तपासणी शिबीर संपन्न

खारघर : खारघर सेक्टर-११ मधील ‘खारघर नगर रहिवासी सेवा संस्था'च्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे २५ सप्टेंबर रोजी  रक्तदान शिबीर, मोफत डोळे आणि आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते. रवतदान शिबीरात २८ तरुणांनी रक्तदान करुन सहभाग नोंदविला. तर आरोग्य तपासणी शिबिरात रक्तदाब, साखरेचे प्रमाण आदी विविध तपासणी करुन डॉक्टरांनी शिबिरार्थींना योग्य मार्गदर्शन केले. तसेच डोळे तपासणी करुन चष्मा विषयी माहिती दिली.

दरम्यान, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ तर्फे खारघर परिसरातील शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठी चित्रकला, निबंध, नृत्य, वेशभूषा, गायन आणि वक्तृत्व आदी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विशेष म्हणजे यावेळी धावणे, चमचा गोटी, बटाटा आदी स्पर्धेत मुले-मुलींसह   नागरिकांनी सहभाग नोंदविला. मंडळाचे यंदाचे चोवीसावे वर्ष आहे.
मंडळाद्वारे दरवर्षी समाज उपयोगी स्पर्धा घेतल्या जातात. मात्र, यावर्षी खारघर परिसरात ताप, हिवताप आजाराचे वाढते प्रमाण आणि वाढतें प्रदूषण रोखण्यासाठी निर्माल्य पासून खतनिर्मिती करण्याचा उपक्रम मंडळातर्फे हाती घेण्यात आला आहे. यावेळी परिसरातील सर्व सोसायटी सदस्यांनी ओला आणि सुका कचऱ्यापासून खत निर्मिती करण्याचा संकल्प केला आहे. या कार्यक्रमात बाल वयात मुले-मुलींना खेळ, विविध स्पर्धा आणि स्पर्धेत यश मिळविण्यासाठी पार कराव्या लागणाऱ्या कसोटी विषयी माहिती देण्यात आली, असे गणेश उत्सवात सहभागी झालेल्या मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

गौरी-गणपती विसर्जनासाठी कृत्रिम तलावांकडे भाविकांचा ओघ