सोनपावलांनी घरो घरी गौराईचे आगमन

नवी मुंबईत  गौरीचे वाजत गाजत आगमन

वाशी : सरला श्रावण भादवा आला आणि गौराय माझी  आली घराला. या गाण्याचे बोल आज घरा घरात कानावर पडताना दिसतील. कारण सोन पावलांनी गौरीचे आगमन गुरुवारी घरोघरी झाले असून शुक्रवारी तिची यथा सांग पूजा करून तिचा मानपान करत वाेवसे वाहिले जाणार आहे.

श्रावण सरी बरसताच हिंदू धर्मात अनेक सणांना सुरूवात होते. श्रावणानंतर भाद्रपद भाद्रपद शुद्ध चतुर्थीला गणपती बाप्पाचे घरोघरी आगमन होते. बाप्पाच्या आगमनानंतर गणेशानंतर ज्येष्ठा गौरींचे आगमन होते. यंदा  गुरुवार दिनांक २१ सप्टेंबर रोजी  नवी मुंबईत  गौरीचे वाजत गाजत आगमन झाले. गौरींचे  आगमन झाले असून आज महापूजन होणार असून, नैवेद्य दाखविण्यात येईल. काही घरांमध्ये पारंपरिक पद्धतीनुसार शाडूच्या, पितळ्याच्या तर काही ठिकाणी सात खड्यांच्या रूपांत गौरीचे आगमन झाले. तर बाजारपेठेत  गौरींच्या दागिन्यांचे असंख्य प्रकार उपलब्ध असल्याने महिलांनी यंदाही गौरींसाठी नवीन दागिन्यांच्या खरेदीवर भर दिला. आकर्षक रोषणाई, फराळाची आरास, सजविलेल्या घरांमध्ये साड्या, नाजूक दागिने परिधान करून दाखल झालेल्या गौरींनी वातावरणात चैतन्यमय रंग भरले. गौराईचे घरामध्ये आगमन झाल्यानंतर हळदीच्या ठशांनी चंदनाचे बोट लावलेल्या पावलांचे ठसे घरभर उमटवले जातात, त्याला गौरी चालवणे असे म्हणतात. विविध रंगाच्या फुलांची आरास करून सजावट केलेल्या गौराईचे स्वागत करताना ‘गौरी चालवण्याची’ प्रथाही आवर्जून पाळली जाते. गौराईचे आगमन झाल्यानंतर शुक्रवारी तिचे पूजन केले जाणार असुन शनिवारी  तिचे विसर्जन केले जाणार आहे.

गौराईचे  आगमन झाल्या नंतर दुसऱ्या दिवशी तिचे मनोभावे पूजन  केले जाते. या दिवशी गौराईचा नैवेद्य आणि जागरण असते. प्रत्येक गावातील प्रथेप्रमाणे महिला गौराईचे जागरण करतात. गौराईची गाणी आणि तिच्यासाठी खास पुरणपोळीचा नैवेद्य दाखवला जातो. - सपना म्हात्रे,गृहिणी

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पशु धन संकटात