स्वच्छतेत ठाणे शहराचा झेंडा देशभर फडकवूया -अभिनेते भाऊ कदम

दादोजी कोंडदेव येथील कार्यक्रमात ठाणेकरांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे -आयुक्त बांगर

ठाणे : स्वच्छ भारत अभियान अंतर्गत इंडियन स्वच्छता लीग या अभियानमध्ये देशातील ३०८५ शहरांचा सहभाग असून महाराष्ट्रातील एकूण ४११ शहरांचा यात समावेश आहे. १५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असा पंधरवडा स्वच्छता लीग म्हणून साजरा केला जाणार असून इंडियन स्वच्छता लीग २.० या उपक्रमातंर्गत ठाणे शहराच्या ‘'ठाणे टायटन्स' या  बोधचिन्हाचे अनावरण संघाचे कर्णधार तथा प्रसिध्द अभिनेते भाऊ कदम यांच्या हस्ते आणि महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या प्रमुख उपस्थितीत डॉ. काशिनाथ घाणेकर नाट्यगृह येथे करण्यात आले.

ठाणे शहराची स्वच्छता उत्तम असली पाहिजे आणि आपल्या शहराने पहिल्या क्रमांकावर झेप घ्ोतली पाहिजे. त्यासाठी इंडियन स्वच्छता लीग या स्पर्धेत मी स्वतः सहभागी होणार आहे. ठाणेकर नागरिकांनीही मोठ्या संख्येने या स्पर्धेत सहभागी व्हावे, असे आवाहन भाऊ कदम यांनी यावेळी केले.

१५ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर असा पंधरवडा स्वच्छता लीग म्हणून साजरा केला जाणार असून  ठाणे शहराची ऐतिहासिक, सांस्कृतिक, राजकीय अशी ओळख आहे. या शहराला स्वच्छ शहराची ओळख मिळवून देण्याचा आपण सगळ्यांनी जोरदार प्रयत्न करुया, असे आवाहनही आयुक्त अभिजीत बांगर यांनी यावेळी केले.

‘इंडियन स्वच्छता लीग'ची प्रमुख उद्दिष्टे म्हणजे ज्या ठिकाणी कचरा होतो त्या जागा हेरुन तिथून कचऱ्याचे समूळ उच्चाटन करणे, समुद्र किनारे, टेकड्या, पर्यटन स्थळे, शहरातील मुख्य सार्वजनिक ठिकाणी तरुणांच्या पुढाकाराने विविध संघाद्वारे मोठ्या प्रमाणात स्वच्छता करणे, कचरामुक्त शहरांसाठी तरुणाच्या स्वच्छतेबाबतच्या सहभागाला चालना देणे असे असून स्थानिक स्वराज्य संस्थांनी या उपकमात सहभागी होणे आवश्यक आहे. यामध्ये नागरिकांचा सहभाग देखील तितकाच महत्वाचा असल्याचे आयुक्त बांगर यांनी नमूद केले.
याच उपक्रमात १७ सप्टेंबर रोजी दादोजी कोंडदेव स्टेडियम येथे ‘इंडियन स्वच्छता लीग'च्या स्पर्धा घ्ोण्यात येणार आहेत. या स्पर्धेत ठाणेकर नागरिकांनी सहभाग घ्यावा, असेही आयुक्त अभिजीत बांगर यांनी नमूद केले. स्पर्धेची लिंक सर्व शाळांना देण्यात येणार असून शाळांनी विद्यार्थी आणि पालक यांच्यामार्फत रजिस्ट्रर करुन सर्व डेटा महापालिका शिक्षण विभागाकडे सादर करावा. तसेच १७ सप्टेंबर रोजी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्वच्छतेच्या अनुषंगाने वेशभूषा करणे, वेगवेगळ्या कल्पनांचे फलक करणे, स्वच्छता आणि इतर काही अनुषंगिक नाविन्यपूर्ण सादरीकरण यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना सहभागी करावे. या स्पर्धेत ज्या शाळा प्रथम क्रमांक प्राप्त करतील, त्या शाळेत ठाणे टायटन्स संघाचे कर्णधार अभिनेते भाऊ कदम स्वतः भेट देतील असेही आयुक्तांनी यावेळी नमूद केले.

यावेळी महापालिका आणि खाजगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकांशी संवाद साधताना शिक्षकांनी उपस्थित केलेल्या शंकाचे निरसन आयुक्त बांगर यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, उमाकांत गायकवाड, आदि उपस्थित होते.
इंडियन स्वच्छता लीग २.० या उपक्रमातंर्गत ठाणे शहराच्या ‘ठाणे टायटन्स' या बोधचिन्हाचे अनावरण करताना संघाचे कर्णधार अभिनेते भाऊ कदम, महापालिका आयुक्त अभिजीत बांगर, अतिरिक्त आयुक्त (१) संदीप माळवी यांनी केले. या प्रसंगी अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, उमाकांत गायकवाड. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

  गृहसंकुले, नागरी वस्ती आदी ठिकाणी होणार टाकीमध्ये विसर्जन