दूधात भेसळ करणाऱ्यांनो सावधान!

सणांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची राहणार करडी नजर

ठाणे : राज्यात दूध आणि दुग्धजन्य पदार्थांमधील भेसळीला पायबंद घालण्यासाठी दुग्धव्यवसाय मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी जिल्हास्तरीय समिती गट करण्याविषयी सूचित केले होते. त्याप्रमाणे ठाणे जिल्ह्याच्या ‘जिल्हास्तरीय समिती'चे गठन करण्यात आले असून या ‘जिल्हास्तरीय समिती'च्या अध्यक्षा अतिरिक्त जिल्हाधिकारी मनिषा जायभाये-धुळे असून या ‘समिती'मध्ये अपर पोलीस अधीक्षक, सहाय्यक आयुक्त (अन्न) अन्न-औषध प्रशासन, जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, उपनियंत्रक, वैधमापन शास्त्र असे सदस्य तर जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी दिपक खांडेकर सदस्य सचिव आहेत.

या ‘समिती'ची कार्यकक्षा शासन निर्णयाप्रमाणे निश्चित करण्यात आली असून यामध्ये दूध आणि दुग्धजन्य पदार्थातील भेसळ रोखण्यासाठी धडक तपासणी मोहीम हाती घेणे, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ भेसळीत सहभागी असणाऱ्या व्यक्ती-आस्थापना यांच्या विरोधात प्रथम खबरी अहवाल (FIR) नोंदवून कारवाई करण्यात यावी. तसेच दूध भेसळ करणाऱ्या व्यक्तीबरोबर भेसळयुक्त दूध किंवा दुग्धजन्य पदार्थ स्वीकारणाऱ्या व्यक्ती-आस्थापनेसही सह आरोपी करण्यात यावे, असे सूचित करण्यात आले आहे.

येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर समितीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ या विषयाकडे अतिशय गांभीर्याने पाहावे. दोषी दुकानदार, व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जनतेला भेसळमुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळणे, आपली जबाबदारी असल्याचे ‘दुग्ध व्यवसाय विभाग'चे सचिव तुकाराम मुंडे यांनी राज्यस्तरीय बैठकीमध्ये सूचित केले आहे.
या दृष्टीने ‘ठाणे जिल्हास्तरीय समिती'ने धडक कारवाई सुरु केली असून ‘समिती'ने शहापूर तालुक्यात तीन ठिकाणी दूध तपासणी केली. त्याचबरोबर जिल्ह्यातील दुग्धव्यवसाय करणाऱ्या व्यापाऱ्यांना निर्वाणीचा इशारा देतानाच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत भेसळ आढळल्यास संबंधित व्यक्ती, आस्थापना यांच्या विरोधात तात्काळ एफआयआर नोंदवून अत्यंत कडक कारवाई करण्यात येणार आहे. तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या बाबतीत भेसळ आढळल्यास तात्काळ सदर ‘समिती'कडे तक्रार करावी, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

येणाऱ्या सणांच्या पार्श्वभूमीवर समितीने दूध आणि दुग्धजन्य पदार्थ या विषयाकडे अतिशय गांभीर्याने पाहावे. दोषी दुकानदार, व्यापाऱ्यांवर कडक कारवाई करावी. जनतेला भेसळमुक्त दूध आणि दुग्धजन्य पदार्थ मिळणे, आपली जबाबदारी आहे. - तुकाराम मुंडे, सचिव-दुग्ध व्यवसाय विभाग. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

न्याय न दिल्यास उरणचे लढवय्ये शेतकरी अन्यायाविरुद्ध लढा देणार