नागरिकांना मोफत आरोग्य सेवा देण्याची मागणी

वाशी मधील महापालिका रुग्णालय समोर शिवसेना (उबाठा) तर्फे निदर्शने  

नवी मुंबई : नवी मुंबई शहरातील झोपडपट्टी आणि चाळी मध्ये राहणाऱ्या आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांना वाशी मधील नवी मुंबई महानपालिका रुग्णालयसह महापालिका माता बाल रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र मध्ये १५ आगस्ट २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार मोफत आरोग्य सेवा मिळण्यासाठी  सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे गट) तुर्भे विभाग प्रमुख बाळकृष्ण खोपडे यांच्या नेतृत्वाखाली नुकतीच वाशी मधील नवी मुंबई महापालिका सार्वजनिक रुग्णालय समोर जोरदार निदर्शने करण्यात आली.

यावेळी महापालिका वैद्यकीय अधिक्षक राजेश म्हात्रे आणि वैद्यकीय अधिकारी राजेश ओतूर्कर यांनी निवेदन देण्यात आले. दरम्यान, लवकरच नवी मुंबई महापालिका आयुक्त यांचा अभिप्राय घेऊन नागरिकांना महापालिका सार्वजनिक रुग्णालय, माता बाल रुग्णालय, नागरी आरोग्य केंद्र मध्ये मोफत आरोग्य सेवा देण्याबाबत आणि मुदत संपलेली जेनरिक औषधे मेडिकल, खाजगी वैद्यकीय टेस्ट केंद्र बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन वैद्यकीय अधिक्षक राजेश म्हात्रे यांनी बाळकृष्ण खोपडे यांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

याप्रसंगी शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) तुर्भे उप विभाग प्रमुख किशोर कांबळे, युवासेना विभाग अधिकारी सस्मित भोईर, शाखा अधिकारी विजय तांडेल, शाखा प्रमुख दत्तात्रय दिवाणे, जहागीर शेख आदींसह झोपडपट्टी आणि चाळी मध्ये राहणारे नागरिक उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली ‘महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरण'ची बैठक संपन्न