दादोजी कोंडदेव प्रेक्षागृहाला नवी झळाळी

ठाणे  : ठाण्याचे भूषण असलेल्या दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृहात खेळाडूंना अधिकाधिक सेवासुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी अनेक कामे हाती घेण्यात आली आहेत, याचाच एक म्हणून स्पोर्ट लायटिंग अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे हायमास्ट बसविण्यात आले असून या हायमास्टचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी (12 जानेवारी) खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते पार पडला.

यावेळी माजी नगरसेवक नजीब मुल्ला, विकास रेपाळे, उपायुक्त्‍ क्रिडाअधिकारी मीनल पालांडे, उपनगरअभियंता विद्युत शुभांगी केसवाणी आदी उपस्थित होते.

 दादोजी कोंडदेव क्रिडाप्रेक्षागृहात ठाणे व ठाण्यालगतच्या परिसरातील अनेक खेळाडू विविध खेळांसाठी येत असतात. या खेळाडूंना आवश्यक सेवा सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी महापालिकेच्या माध्यमातून आवश्यक कामे सातत्याने केली जातात. या ठिकाणी रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश मिळावा यासाठी नुकतेच स्पोर्ट लायटिंग अंतर्गत आंतरराष्ट्रीय दर्जाचे हायमास्ट बसविण्यात आले असून या अंतर्गत एकूण 4 हायमास्टचा समावेश असून त्याची 62 मीटर इतकी आहे. प्रत्येक हायमास्टवर 1620 कि.वॅटचे 120 दिवे बसविण्यात आले आहे.

हायमास्टच्या उद्घाटनानंतर खासदार श्रीकांत शिंदे, माजी नगरसेवक नजीब मुल्ला, विकास रेपाळे यांनी देखील क्रिकेटचा आनंद लुटला. तसेच दादोजी कोंडदेव स्टेडियमवर सुरू असलेल्या क्रिकेटच्या सामन्यामधील खेळाडूंना शुभेच्छा दिल्या.

सदरचे हायमास्ट बसविल्यामुळे दादोजी कोंडदेव स्टेडियमला एक झळाळी प्राप्त झाली असून रात्रीच्या वेळेस पुरेसा प्रकाश उपलब्ध होणार असून खेळाडूंची गैरसोय कायमस्वरुपी दूर झाली असून याचा लाभ अधिकाधिक खेळाडू घेतील असा विश्वास महापालिका आयुक्‌त्‍ अभिजीत बांगर यांनी व्यक्त केला आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल मध्ये रंगणार कबड्डीचा थरार!