उरण रेल्वे स्थानकाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्‌घाटन

 उरण : गेली अनेक वर्षांपासून उरण रेल्वे कधी सुरू होणार या प्रतीक्षेत असलेल्या उरणकरांनी आज रेल्वे सुरू झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला. गेली अनेक वर्षांपासून उरणकर रेल्वेच्या प्रतीक्षेत होते. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उरण-नेरुळ रेल्वे सेवेचा शुभारंभ करण्यात आला. यामुळे उरणच्या जनतेत समाधान व्यक्त केले जात आहे.

गेली वर्षांपासून उरण रेल्वे सुरू होईल या आशेवर उरणकर होते. परंतु प्रत्येकवेळी उरणकरांचा भ्रमनिराश होत होता. मात्र, प्रदीर्घ काळानंतर उरण रेल्वे सेवेला मुहूर्त मिळाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते न्हावा शिवडी अटल सेतूचे उद्‌घाटन झाले. त्यानंतर उलवा येथून उरण नेरुळ रेल्वेला झेंडा दाखवून उरण येथून रेल्वे नेरुळ येथे रवाना झाली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, इतर मंत्री व मान्यवरांच्या उपस्थितीत उरण रेल्वेचा शुभारंभ झाला.


यामुळे गेली अनेक वर्षांपासून उरण रेल्वे कधी सुरू होणार या प्रतीक्षेत असलेल्या उरणकरांनी आज रेल्वे सुरू झाल्याने सुटकेचा निःश्वास सोडला आहे. उरण रेल्वे व अटल सेतूचा फायदा आता द्रोणागिरी नोडमधील बिल्डर लॉबी उचलतील. तसेच आता येथील उरल्या सुरल्या जमिनीचे भाव गगनाला भिडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 तलाव संवर्धनाच्या कामांनंतर ठाणे शहराची ओळख कायम