सर्वंकष स्वच्छता अभियानास #DeepCleaningCampaing वर्तकनगर परिसरात उत्स्फूर्त प्रतिसाद

ठाणे : ठाणे महानगरपालिकेच्यावतीने सर्वंकष स्वच्छता अभियान #DeepCleaningCampaing  शनिवारी महापालिकेच्या वर्तकनगर प्रभागसमिती कार्यक्षेत्रात राबविण्यात आले. या मोहिमेत सफाई कर्मचाऱ्यांसमवेत विविध सामाजिक संस्थांचे स्वयंसेवक, एनसीसीचे विद्यार्थी तसेच वर्तकनगर परिसरात राहणारे नागरिक सहभागी झाले.

महापालिका आयुक्त् अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिकेचे उपायुक्त, सहाय्यक आयुक्त् यांच्या देखरेखीखाली सकाळी 6.00 वाजता या सर्वंकष स्वच्छता अभियानास प्रारंभ करण्यात आला. या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत आमदार प्रताप सरनाईक, संजय केळकर, माजी महापौर नरेश म्हस्के, माजी नगरसेविका परिषा सरनाईक, जयश्री डेव्हीड, विमल भोईर, स्नेहा आंब्रे आदी सहभागी झाले होते. वर्तकनगरमधील मुख्य रस्ते, अंतर्गत रस्ते, पाईपलाईन परिसर, नाले, दुभाजक, फूटपाथची साफसफाई तसेच रस्ते पाण्याने धुवून स्वच्छ करण्यात आले.

वर्तकनगर प्रभागसमितीअंतर्गत येऊर परिसरातील फॉरेस्ट गेट ते रिक्षा स्टॅण्ड, पाटोणापाडा, रोनाचा पाडा ते शामियाना हॉटेल, जंगल कॅम्प, एक्झोटिका हॉटेल ते पाटील बंगला, पाचगल्ली, शिवाईनगरमधील  देवदया सर्कल ते राघोजी भांगरे चौक, शास्त्रीनगर, देवदयानगर, रामबाग परिसरातील उपवन इंडस्ट्रीज, टीएमटी डेपो, पायलादेवी, उपवन मैदान, कॅडबरी परिसरातील कॅडबरी सिग्नल ते माजिवडा सिग्न्ल हायवे, माजिवडा नाका, लक्ष्मी चिरागनगर, पोखरण रोड नं. 2 येथील गांधीनगर पाण्याची टाकी परिसर, माजिवडा ते तत्वज्ञान विद्यापीठ, पेपर प्रॉडक्ट कंपनी, गांधीनगर, माजिवडा सर्कल मेट्रो पिलर,  तुळशीधाम परिसरातील वसंत विहार, हाईड पार्क, धर्मवीरनगर, हिरानंदानी मेडोज, डॉ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, जयभवानीनगर, कोकणीपाडा टिकूजीनीवाडी, आंब्रे सर्कल, प्रेस्टीज सोसायटी, वसंतविहार, पवारनगर, नळपाडा गांधीनगर, गावंडबाग, कोकणीपाडा, भीमनगर, वर्तकनगर, समतानगर आदी परिसरातील अंतर्गत रस्ते, मुख्य रस्त्यांची साफसफाई करण्यात आली.

या सर्वंकष स्वच्छता मोहिमेत ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त 1 संदीप माळवी, अतिरिक्त आयुक्त 2 प्रशांत रोडे, उपायुक्त तुषार पवार, सहाय्यक आयुक्त तसेच विभागप्रमुख व महापालिका कर्मचारी देखील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

उपवन परिसराची पाहणी
सर्वंकष स्वच्छता मोहिमेदरम्यान आयुक्त अभिजीत बांगर यांनी संपूर्ण उपवन तलावाची पाहणी केली. उपवन तलाव येथे सुरू असलेले सुशोभिकरण, विसर्जन घाट तसेच संपूर्ण परिसराची पाहणी करत असताना सदरचे काम लवकरात लवकर पूर्ण करावे अशा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. या पाहणी दरम्यान आमदार प्रताप सरनाईक, महापौर नरेश म्हस्के तसेच स्थानिक लोकप्रतिनिधी उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सावित्रीबाईचे कार्य म्हणजे युग कार्यच - न्या.बी.एल.वाघमारे