ट्रक चालकांबाबतचा कायदा म्हणजे पोलिसी राज्य आणण्याचा व्यापक कट -जितेंद्र आव्हाड

ठाणे ः एखादी व्यक्ती दगावली तर ट्रक चालकाला लगेच दहा वर्षांसाठी तुरुंगात टाकायचे ? हेच ट्रक चालक जीवाची पर्वा न करता सलग दहा-दहा दिवस गाडी चालवून सर्वांनाच जीवनावश्यक वस्तू पुरवतात ना ?  भारतात कोणाच्या कामाची किंमतच नाही राहिली का ? असा सवाल ‘इंडिया आघाडी'चे प्रवक्ते तथा ‘राष्ट्रवादी'चे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित व्ोÀला आहे. देशात पोलिसी राज्य आणण्याचा कट रचण्यात आला असल्याचा आरोप आ. जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला.

जाचक कायद्याच्या विरोधात ट्रक चालकांनी पुकारलेल्या ‘बंद'ला जितेंद्र आव्हाड यांनी आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संदर्भात त्यांनी २ जानेवारी रोजी पत्रकारांशी संवाद साधला.
‘वेंÀद्र सरकार'ने जे ‘सीआरपीसी'मध्ये बदल करताना एखादी व्यक्ती ट्रक खाली येऊन दगावली तर ट्रक चालकाला १० वर्षे कैद आणि १० ते १५ लाखांचा दंड अशी तरतूद करण्यात आलेली आहे. प्रश्न असा आहे की अपघात घडतो त्यामध्ये फक्त ट्रक चालकाचीच चूक असते का? मग तुमचे नियम इतके कठोर करा. झेब्रा क्रॉसिंग व्यतिरिक्त अन्य ठिकाणी रस्ता ओलांडणाऱ्यांच्या घरच्यांनाही १० लाखांचा दंड आकारा. कायदा फक्त ट्रक चालकांनाच नाही तर छोट्या वाहनांनी जे अपघात होत असतात, त्यांनाही तो लागू करण्यात येणार आहे. म्हणजेच चांगल्या घरातील मुलेही जेलमध्ये जाणार आहेत. आतापर्यंत शिक्षेची मर्यादा २ वर्ष होती ती आता १० वर्ष केली आहे. याचाच अर्थ सदरचा गुन्हा आता न्यायदंडाधिकाऱ्यांकडून सत्र न्यायालयात वर्ग होणार असून आरोपींना जामीन मिळण्यासाठी किमान ९० दिवस लागणार आहेत, असे आ. जितेंद्र आव्हाड म्हणाले.
वास्तविक पाहता कोणताही कायदा करताना ज्यांचा सबंध सदर कायद्याशी येणार आहे, त्यांच्याशी चर्चा करणे गरजेचे असते. कायदा आपल्या मनाप्रमाणे करायचा नसतो. तर कायदा समाजासाठी उपयुक्त आहे की नाही, याचा सारासार विचार करुन कायदा करायचा असतो. पण, या कायद्याने अनेकजण जेलमध्ये जातील. म्हणजेच आपल्या देशाचा जो परिघ आहे. त्याचा अर्धा भाग तुरंगात रुपांतरीत करावा लागेल. आजमितीस तुमच्या जेलमध्ये जागा आहेत का? आरोपींचीही मानवी मूल्य जपावी लागतात. सर्व मानवी मूल्यांची हत्या करून या देशाला पोलिसी राज्य करण्याचा जर प्रयत्न असेल तर त्याला विरोध झालाच पाहिजे, असेही आमदार आव्हाड यांनी सांगितले.
ट्रक चालकांच्या बंदला काही राज्यात हिंसक वळण लागत आहे याबद्दल विचारले असता, हिंसेचे आपण समर्थन करीत नाही. पण, जेव्हा ट्रक चालक उभे राहिले तर भारत बंद करु शकतात. आता या बंदमुळे भाज्या, अन्नधान्य, इंधन मिळणे बंद होणार आहे. आधीच देशात ४० टवव्ोÀ ट्रक चालक कमी आहेत. गरीबांबद्दल दया-माया-आपुलकी नाही. मग, टाका त्यांना तुरूंगात, असाच प्रकार घडवायचा आहे, अशी टीका आव्हाड यांनी केली.
कायदे पारीत करण्यासाठीच खासदारांचे निलंबन करण्यात आले होते का? यावर बोलताना डॉ. आव्हाड यांनी देशात पोलिसी राज्य लागू करण्याचा तो एक कटच आहे. ‘संविधान'ने दिलेला जामीनाचा अधिकार खेचून घ्ोतला जात आहे. त्यातूनच जन्माला येणारे पोलिसी राज्य देशाला कुठे घ्ोऊन जाणार आहे, ते सर्वांनाच माहित आहे. शेतकरी आंदोलनही दोन दिवसात संपेल, असे सत्ताधाऱ्यांना वाटत होते. पण, माणसे जेव्हा ईर्षेने पेटतात, तेव्हा ते मरणालाही घाबरत नाहीत. ट्रकवाले या कायद्याला घाबरले आहेत. ट्रक चालकांच्या संपामुळे दूध, भाजीपाला बंद होणार; पाण्याचे टँकर्स बंद होतील. परिणामी, सामान्यांचे जगणे असह्य होणार आहे. सदरचे आंदोलन फक्त ठाण्याच्या वागळे ईस्टेट पुरतेच मर्यादित नाही की दत्त मंदिरात बैठक घ्ोऊन प्रश्न सुटला. तो देशभरातील संप आहे, अशा शब्दात आ. जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी सरकारला फटकारले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महावितरण कर्मचाऱ्याला मारहाण; बाप-लेकाविरुध्द गुन्हा