वणव्यामुळे खारघर मधील शेकडो हेक्टर जंगल जळून खाक

‘जंगलात वणवा लावू नका, आग विझविण्यासाठी सहकार्य करा'

खारघर ः जंगलात वणवा लावणे, दंडनीय अपराध असून, वन अधिनियमानुसार अजामीनपात्र गुन्हा आहे. तसेच जंगलात वणवा लावणाऱ्या व्यवतीस एक वर्ष तुरुंगवास अथवा दोन लाख रुपये दंड होऊ शकतो. त्यामुळे ‘जंगलात वनवा पेटवू नका, वनवा पेटल्यास विझविण्यासाठी सहकार्य करा', असे आवाहन करणारे फलक पनवेल वन विभागाकडून लावण्यात आले आहेत.
खारघर सेक्टर३५, ओवा, तळोजा जेल समोरील डोंगरावर गेल्या डिसेंबर महिन्यात जवळपास दहा पेक्षा अधिक वेळा लावण्यात आलेल्या वणव्यामुळे  शेकडो हेक्टर जंगल जळून खाक झाले. हजारो झाडे जळून गेली. मोठी नैसर्गिक हानी झाल्याने जागे झालेल्या पनवेल वन विभागाने खारघर तसेच ओवा टेकडीच्या प्रवेश मार्गावर असलेल्या रस्त्यावर आणि डोंगराच्या पायथ्याशी जनजागृतीसाठी फलक लावले आहेत. शेतातील पाला-पाचोळा जळताना निष्काळजीपणा दाखविणे, वन जमनीवर अतिक्रमण करणे आणि धुम्रपान आदी विविध कारणांमुळे वणवा पेटतो. वणव्यामुळे निसर्गाची मोठी हानी होते.त्यामुळे वनात आग लावणे आणि धुम्रपान करण्याचे कृत्य करताना आढळल्यास  एक वर्ष तुरुंगवास अथवा दोन लाख रुपये दंड होऊ शकतो. जैवविविधता अधिनियमानुसार एक वर्ष कारावास,दोन लाखाचा दंड होऊ शकतो. त्यामुळे वन वाचवण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन पनवेल वन विभाग द्वारे करण्यात आले आहे.
दरम्यान, वनात वणवा लावण्याचे  काही प्रकार दिसून आल्यास ०२२-२७४५२७५९ आणि  ८२९१२४६३५१ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पनवेल वन विभाग तर्फे करण्यात आले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 ट्रक चालकांबाबतचा कायदा म्हणजे पोलिसी राज्य आणण्याचा व्यापक कट -जितेंद्र आव्हाड