पनवेल महानगरपालिकेची नागरिकांना नवीन वर्षाची आरोग्यदायी भेट

महापालिकेच्या दोन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व दोन आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन

 पनवेल : महापालिका कार्यक्षेत्रातील लोकसंख्या वाढते आहे.इतक्या मोठ्या प्रमाणात लोकसंख्या वाढत असताना या सर्वांच्या आरोग्याची जबाबदारी महापालिकेने हाती घेतली आहे. पायाभूत सुविधांप्रमाणेच आरोग्य सेवेला आयुक्तांनी प्रथम प्राधान्य देऊन आरोग्याच्या चांगल्या सुविधा दिल्या आहेत.वर्षाच्या सुरूवातीला महापालिकेने नागरिकांना आरोग्यदायी भेट दिली आहे, असे आमदार प्रशांत ठाकूर यांनी सांगितले.
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील नागरिकांना प्राथमिक उपचारांच्या उत्तम सुविधा मिळण्याच्या दृष्टीने पनवेल महानगरपालिकेच्यावतीने कळंबोली व कामोठे येथे नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ,आसुडगाव, तळोजा येथील आरोग्य वर्धिनी उपकेंद्राचे उद्घाटन पनवेल मतदार संघाचे आमदार श्री. प्रशांत ठाकुर, यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते बोलत होते.
यावेळी पनवेल महानगरपालिका आयुक्त  गणेश देशमुख, मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी, माजी नगरसेवक,माजी नगरसेविका , महापालिका वैद्यकिय अधिकारी, आरोग्य कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वणव्यामुळे खारघर मधील शेकडो हेक्टर जंगल जळून खाक