गुळसुंदे येथे रंगीत कलिंगड लागवड


नवीन पनवेल ः शेतीमध्ये नवनवीन उत्पादने घ्ोण्याचा प्रयत्न करणारे कृषीतज्ञ तथा महाराष्ट्र राज्य कृषीभूषण पुरस्काराने सन्मानित मिनेश गाडगीळ यांनी पनवेल तालुवयातील गुळसुंदे येथे रंगीत कलिंगडाची लागवड ऑक्टोबरमध्ये केली आहे. आता गाडगीळ यांना याद्वारे कलिंगडाचे चांगल्या प्रमाणात उत्पादन सुरु झाले आहे.
 

मिनेश गाडगीळ यांनी नोन यु सीडस या कंपनीच्या बीया खरेदी करुन साधारण १०० रोपे तयार करुन लावली होती. ज्यामध्ये वरील आवरण पिवळे असुन आतील गर लाल आहे. तसेच आरोही जे वरुन हिरवट काळे असून आतील गर पिवळ्या रंगाचा आहे. त्याप्रमाणेच कुंदन अशी मस्कमेलनची व्हरायटीज त्यांनी घ्ोतली आहे. जमिनीत शेणखत देऊन दोन फुट बाय पाच फुट अंतर ठेवत वाफे बनवले. तसेच ड्रीपच्या माध्यमातून पाणी व्यवस्थापन करुन अतिशय कमी खत आणि फवारण्या दिल्याने मिनेश गाडगीळ यांना आता तीन महिन्यात भरपूर उत्पादन सुरु झालेले आहे. रायगड जिल्ह्यातील हवामान आणि माती उत्पादनासाठी साजेशी असल्याने कलिंगडाला अतिशय गोड, एक वेगळाच स्वाद आणि आकर्षक रंग यामुळेच ग्राहकांची विशेष पसंती असल्याचे मिनेश गाडगीळ यांनी सांगितले. एकंदरीतच पारंपारिक पिकांबरोबर नाविन्यपूर्ण शेती उत्पादने शेतकऱ्यांनी घ्ोतली पाहिजेत. तरच शेती नपयात येइल, असे वृÀषीभूषण मिनेश गाडगीळ यावेळी बोलताना म्हणाले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महानगरपालिकेची नागरिकांना नवीन वर्षाची आरोग्यदायी भेट