घाबरू नका… पण जागरूक रहा

पनवेल  महापालिकेचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन

पनवेल : देशातील काही भागात कोविडचा जेएन1 या नवीन विषाणूचे रुग्ण आढळून आल्याने चिंता वाढली असली तरी  महापालिका आयुक्त गणेश देशमुख यांनी नागरिकांना घाबरून न  जाता जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.

 नागरिकांनी  कोविडसदृश्य लक्षणे दिसल्यास त्याकडे दुर्लक्ष करून नये. कोरडा खोकला, ताप ,घसा खवखवणे , श्वास घेण्यास त्रास जाणवत असेल तर चाचणी, सर्वेक्षण आणि उपचार या त्रिसूत्री  पालन करावे अशा सूचना प्रशासनाच्यावतीने मुख्य वैद्यकिय अधिकारी डॉ. आनंद गाेसावी यांनी  दिल्या आल्या आहेत. कोरोनाशी लढायचे असेल तर सतर्कता बाळगणे हाच महत्वाचा उपाय आहे. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळणे, मास्कचा वापर करणे, वारंवर हात साबणाने धुणे, सुरक्षित अंतर राखणे अशा काही महत्वाच्या गोष्टीचे पालन केल्यास कोविडचे संकट टाळता येणे शक्य आहे.

कोविडच्या जेएन 1 या नवीन विषाणूच्या पार्श्वभूमीवरती नुकताच आयुक्तांनी वैद्यकिय सोयी सुविधांचा आढावा घेतला. महापालिका हद्दीतील डीसीएच कळंबोली व खाजगी रूग्णालयामध्ये आयसोलेशनचे ऑक्सीजन विरहित 244 खाटा, आयसोलेशन ऑक्सीजनसहित 789 खाटा, 258 आयसीयू खाटा,94 व्हेंटिलेटर उपलब्ध करण्यात आल्या आहेत.

कोविडची लक्षणे असलेल्या रूग्णांनी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामधील मोफत चाचणी व उपचाराचा लाभ घ्यावा तसेच नागरिकांनी  घाबरून न जाता सतर्क राहून महापालिकेने सांगितलेल्या प्रतिबंधात्मक उपायांचे पालन करण्याविषयीचे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात येत आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

महापालिका तर्फे कोपरखैरणे मध्ये दोन आकांक्षी शौचालय उभारणी