सीआरझेड क्षेत्रावर बालाजी मंदिर बांधकामाला एमसीझेडएमएची मंजूरी

सीआरझेड क्षेत्रावर उभारल्या जाणा-या बालाजी मंदिराला एमसीझेडएमएची  मंजूरी

नवी मुंबई: महाराष्ट्र किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन प्राधिकरणाने (एमसीझेडएमए) सीआरझेड क्षेत्रावर उभारल्या जाणा-या बालाजी मंदिराला आपली अटींवर मंजूरी दिली आहे. ही मंजूरी देताना किनारपट्टी प्रभाग व्यवस्थापन आराखड्याला (सीझेडएमपी) विचाराधीन घेण्यात आले आहे. परंतू पर्यावरणवाद्यांनी या मंजूरीला विरोध दर्शवला आहे.

मंदिर भूखंडाच्या सभोवती ५० मीटर एवढा खारफुटींचा बफर झोन असून हा भाग सीआरझेड१ मध्ये आंतर्भूत होतो. तरी देखील एमसीझेडएमए इथे कुंपणाच्या भिंती आणि लॉन्सच्या बांधकामासाठी परवानगी दिली आहे. बफर झोनमध्ये खरंतर कोणताही अडथळा आणता कामा नये, असे नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी एन कुमार म्हणाले.

२ नोव्हेंबर रोजी एमसीझेडएमएद्वारे घेतलेल्या १७० व्या बैठकीची मिनिट्स एमसीझेडएमएच्या वेबसाइटवर नुकतेच अपलोड झाली आहेत. यामध्ये तिरुपती तिरुमला देवस्थानमने (टीटीडी) सादर केलेल्या सुधारीत बांधकाम प्रस्तावाला अटींवर मंजूरी देण्यात आली आहे. कुमार यांनी हे निदर्शनास आणून दिले आहे की, विस्तीर्ण आंतरभरती पाणथळ क्षेत्रे आणि दलदलींच्या व्यतिरिक्त संपूर्ण ४०,००० चौ.मीटर आकारमानाचा भूखंड मुंबई ट्रान्स हार्बर लिंकच्या तात्पुरत्या स्वरुपाच्या कास्टिंग यार्डमधून घेण्यात आला आहे. परंतू हे कास्टिंग यार्ड स्वतः १६ हेक्टर क्षेत्रावर खारफुटींची कत्तले करुन उभारण्यात आले असल्याचे वास्तव एमसीझेडएमएने दुर्लक्षित केले आहे.  

या भरावाला रिकामे करुन खारफुटी, पाणथळ क्षेत्रे आणि दलदलींसह पाच वर्षांआधीच्या त्याच्या मूळ स्वरुपात पुन:स्थापित करणे आवश्यक आहे, असे कुमार म्हणाले.

“पर्यावरणदृष्ट्या एवढ्या संवेदनशील स्वरुपाच्या भागाचा अजिबात विचार केला जात नसल्याची बाब अतिशय दुर्दैवी आहे,” असे कुमार म्हणाले. त्यांनी मंदिराच्या भूखंडाच्या वाटपाला आधीच राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणामध्ये (एनजीटी) आव्हान दिले आहे.

दुसरी आणखीन एक ठळक बाब म्हणजे सीझेडएमपीला केंद्राद्वारे मंजूर करण्यात आले आहे. भूखंडाच्या आराखड्यामधून जाणारी पूर रेषा यामध्ये स्पष्ट दाखवण्यात आली असून देखील एमसीझेडएमएने याकडे सपशेल दुर्लक्ष केले आहे, असा मुद्दा कुमार यांनी मांडला.

इनस्टिट्यूट ऑफ रिमोट सेन्सिंग (आयआरएस) अण्णा विद्यापीठ-चेन्नईद्वारे तयार करण्यात आलेल्या सीआरझेड आराखड्याप्रमाणे, हे स्थळ अंशत: स्वरुपात सीआरझेड१एमध्ये (२,७४८.१८ चौ.मीटर), तसेच अंशत: स्वरुपात सीआरझेड२मध्ये (७,७२९.२८ चौ.मीटर आणि सीआरझेड क्षेत्राबाहेर (२९,५२३ चौ.मीटर) आहे. प्रकल्प प्रास्तावकांना बफर झोनमध्ये बागेचे/लॅंडस्केपिंगचे आणि कुंपणाच्या भिंतीचे काम विस्तारण्याची इच्छा होती.

सीआरझेड१ क्षेत्रात सिडकोने केलेल्या भूखंडाच्या वाटपाला नॅटकनेक्टने एनजीटीच्या पश्चिम प्रभाग खंडपीठामध्ये आव्हान दिले आहे.

कांदळवन कक्षाद्वारे केलेल्या पाहणीमध्ये देखील मंदिराचा भूखंड पाणथळ क्षेत्रावर असल्याचे दाखवण्यात आले आहे. भूखंडाला लागूनच आंतरभरती मासेमारीचे तळे असल्याचे नॅटकनेक्टने स्पष्ट केले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

अखेर महावितरण आली जाग