पनवेल, नवीन पनवेल मधील टोइंग व्हॅन बंद

पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते बेकायदेशीर वाहनतळ

नवीन पनवेल : वाहतुक पोलिसांकडून दिवाळीनंतर टोइंग व्हॅन बंद करण्यात आल्यामुळे पनवेल रेल्वे स्थानक परिसरातील रस्ते बेकायदेशीर वाहनतळ होऊन बसले आहेत. पनवेल आणि नविन पनवेलमध्ये पार्कींगची मोठी समस्या आहे. त्यामुळे पनवेल आणि नवीन पनवेल मधील बंद टोइंग व्हॅन पुन्हा सुरु करण्याची मागणी केली जात आहे.

नवीन पनवेल शहरालगत ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहिले आहेत. येथील नोकरदार वर्गाला रिक्षा चालकांच्या मनमानीमुळे नाइलाजास्तव दुचाकी वाहने घेऊन कामधंद्या निमित्त मुंबई, नवी मुंबईकडे ये-जा करावे लागते. यामुळे नवीन पनवेल रेल्वे स्थानक परिसरात सेक्टर-१५, १५ए, १७,१८ येथील फूटपाथवर, रस्त्यावर बेकायदेशीरपणे दुचाकी, रिक्षा तसेच चारचाकी वाहने वाहन चालकांकडून पार्क केली जात आहेत. रेल्वे स्थानक परिसरातील सिडको आणि रेल्वे पे अँण्ड पार्क दुचाकी वाहनांनी पूर्ण भरले जात आहेत. त्यामुळे वाहने नो पार्किंग मध्ये उभी केली जात आहेत. पनवेल शहरात देखील पाकाींग समस्या आहे. पनवेल, नवीन पनवेल मध्ये कुठेही वाहने उभी केली जात आहेत. यामुळे सेक्टर-१७, पीएल-५ मधील गल्लीत फूटपाथवर, रस्त्यांवर बेकायदेशीर वाहने पार्क केली जात आहेत. या परिसरात वाहतुकीची कोंडी होते. शिवाय शाळा याच मार्गावर असल्याने विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण झाला आहे. वाहतुक पोलिसांद्वारे बेशिस्त वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली जाते. पण, वाहतुक नियंमाना फाटा देत मनमर्जीने वाहने उभी केली जात असल्याने वाहतूक पोलिसांनी बेशिस्त वाहनचालकांना शिस्त लावण्यासाठी विशेष मोहीम हाती घेण्याची तसेच पनवेल-नवीन पनवेल मध्ये बंद असलेली टोइंग व्हॅन सुरु करण्याची मागणी पनवेल आणि नवीन पनवेल मधील सुजाण नागरिकांसह वाहनचालकांकडून केली जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सीआरझेड क्षेत्रावर बालाजी मंदिर बांधकामाला एमसीझेडएमएची मंजूरी