साहित्य मंदिर वाशी येथे ग्रंथालीच्या विज्ञानधारा - आरोग्य यात्रेची सांगता होणार

ग्रंथालीच्या ४९ व्या वाचकदिनी वाशीमध्ये दोन दिवसीय भरगच्च कार्यक्रम

नवी मुंबई : वाचक चळवळ म्हणून ख्यातनाम असलेल्या ग्रंथालीतर्फे २४ डिसेंबर रोजी विज्ञानधारा आणि आरोग्ययात्रेची सांगता व २५ डिसेंबर रोजी ४९ वा वाचकदिन सोहळा वाशी सेवटर ६ येथील प्रा. माणिकराव कीर्तने वाचनालय, साहित्य मंदिर सभागृह येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमास नवी मुंबई महानगरपालिकेचेही सहकार्य लाभले आहे.

२४ डिसेंबर रोजी सानपाडा गावातील शाळा क्र.११६, वाशी सेवटर, १५ येथील मनपा शाळा, ऐरोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळील शाळा येथे शरद काळे, डॉ. सुधीर आणि नंदिनी थत्ते विद्याथ्याना विज्ञानविषयक मार्गदर्शन करणार आहेत. तर आठवीत असलेला अनुपम नेरकर मनपा शाळा क्र.१०१ शिरवणे येथे स्वतः बनवलेल्या ड्रोनचे प्रात्यक्षिक दाखवणार आहे. बदलती जीवनशैली या विषयावर डॉ. अंजली कुलकर्णी यांचे व्याख्यान साहित्य मंदिरात पार पडणार आहे. विज्ञानधारा यात्रेच्या सांगता समारंभात पद्मभूषण डॉ. ज्येष्ठराज जोशी, प्रा. मोहनसिंग शर्मा, अ.पां.देशपांडे, नवी मुंबई मनपा आयुवत राजेश नार्वेकर उपस्थित राहणार आहेत असे या सर्व उपक्रमाची माहिती घेण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ग्रंथालीच्या कार्यक्रम संयोजक धनश्री धारप यांनी सांगितले. २५ डिसेंबर रोजी अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉ. रविंद्र शोभणे यांचा नवी मुंबई मनपाच्या वतीने सत्कारही करण्यात येणार आहे. सायंकाळी पार पडणाऱ्या विविध कार्यक्रमांत अनुदान प्रदान, ग्रंथालीच्या नवीन पुस्तकांचे प्रकाशन, मधुराणी गोखले यांच्या ‘कवितेच्या पानांतून' याचे सादरीकरण यांचा समावेश असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. या प्रसंगी प्रा. माणिकराव किर्तने वाचनालयाचे अध्यक्ष सुभाष कुळकर्णी, नवी मुंबई पालिकेचे जनसंपर्क अधिकारी महेंद्र काेंडे, माधव ठाकूर, अशोक पालवे, हेही उपस्थित होते

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

उत्पादनात वाढ; कांदा दरात घसरण होण्यास सुरुवात