करंजा बंदरात बोटीला लागलेल्या आगीत बोट भस्मसात

अग्निशमन दल व स्थानिकांच्या तत्परतेने आग रोखल्याने अन्य बोटींचे नुकसान टळले

उरण : महत्वाचे मच्छिमार बंदर म्हणून नावलौकीक असलेल्या करंजा-नवापाडा येथील बंदरावर उभ्या असलेल्या बोटीला १९ रोजी सकाळी ९ वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागून या आगीत ही बोट पुर्णपणे जळून खाक झाली. अग्निशमन दल आणि स्थानिक मच्छिमारांनी ही आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केल्यामुळे या आगीची झळ तेथे उभ्या असलेल्या दुसऱ्या बोटींना बसली नाही.

 जळालेली ही बोट अर्धवट बांधलेल्या अवस्थेत होती. दीपराज नाखवा यांच्या मालकीची असलेल्या या बोटीची बांधणी चालु असताना दिपराज नाखवा यांचे निधन झाल्यामुळे या बोटीची बांधणी थांबली होती. १९ तारखेस बोटीवर काही काम सुरू असताना या बोटीने पेट घेतला. फायबरची बोट असल्यामुळे क्षणार्धात या आगीने बोटीला वेढले आणि ती जळून खाक झाली. अग्निशमन दलाने आणि स्थानिकांनी आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीने प्रयत्न केल्यामुळे ही आग आजूबाजूला पसरली नाही व अन्य बोटींचे संभाव्य नुकसान टळले. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

रहिवाशांच्या एकजुटीमुळे अतिक्रमणाचा कट असफल