ठाणे महानगरपालिकेची जाहिरात फी थकबाकीदारांवर कारवाई

ठाणे महानगरपालिकेची होर्डिंगधारकांवर जाहिरातीची फी थकविल्याप्रकरणी धडक कारवाई

ठाणे  :ठाणे महापालिका क्षेत्रातील विविध होर्डिंगधारकांनी जाहिरातीची फी थकविल्याप्रकरणी धडक कारवाई करण्यात आली. या कारवाईत, जाहिरात फी थकविलेल्या १८ होर्डिंगवरील जाहिरातींचे फ्लेक्स उतरवण्यात आले. फ्लेक्स काढण्याची कारवाई सहायक आयुक्त अलका खैरे यांच्या नेतृत्वात जाहिरात विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केली. या कारवाईनंतर, जाहिरातदारांनी त्यांच्याकडे थकीत असलेली ६३ लाख रुपयांची जाहिरात फी जमा केल्याची माहिती जाहिरात विभागाचे उपायुक्त महेश सागर यांनी दिली. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

 मराठी नामफलक लावण्यासाठी दुकानदारांची धावपळ