आशुतोष डुंबरे ‘ठाणे'चे नवे पोलीस आयुक्त
मावळते पोलीस आयुवत जयजित सिंग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे डीजी
ठाणे : होणार, होणार म्हणून गेल्या कित्येक महिन्यांपासून ठाणे पोलीस आयुवतांच्या बदलीला अखेर ११ डिसेंबरचा मुहूर्त मिळाला. ठाणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यरत असलेले जयजित सिंग यांची बदली राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागात पोलीस महासंचालक पदी करण्यात आली आहे. तर अपेक्षेप्रमाणे ठाणे शहर पोलीस आयुक्त म्हणून आशुतोष डुंबरे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे.
‘ठाणे'चे २४ वे पोलीस आयुक्त म्हणून आशुतोष डुंबरे कार्यभार स्वीकारणार आहेत. १९९४ च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी असणारे डुंबरे राज्य गुप्तवार्ता विभागात अतिरिवत पोलीस महासंचालक म्हणून महाराष्ट्र राज्य पोलीस मुख्यालय येथे कार्यरत होते.
नवे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीशी चांगलेच परिचित आहेत. आशुतोष डुंबरे ठाणे आयुक्तालयात यापूर्वी गुन्हे शाखाचे पोलीस उपायुक्त म्हणून कार्यरत होते. तर त्यानंतर पुन्हा ठाणे शहर पोलीस आयुक्तालयात सह पोलीस आयुक्त म्हणून त्यांची नियुक्ती झाली होती. या कार्यकाळात डुंबरे यांनी ठाण्यात कायदा-सुव्यवस्था बाबत भरीव कामगिरी केलेली होती. त्यानंतर सोमवारी ११ डिसेंबर रोजी पुन्हा त्यांची नियुक्ती ठाणे शहर पोलीस आयुक्त म्हणून करण्यात आलेली आहे. महाराष्ट्र राज्य गुप्तवार्ता विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक असताना आशुतोष डुंबरे यांना उल्लेखनीय कामगिरीबद्दल आणि अतिविशिष्ट सेवेसाठी राष्ट्रपती पदक प्राप्त झालेले आहे.
सन २०१७ च्या दरम्यान ठाणे पोलीस सह-आयुक्त महणून कार्यरत असताना २६ फेब्रुवारीला सैन्यभरती पेपर फुटीतील १८ आरोपींची धरपकड नागपुर, पुणे आणि गोवा मधून अटक करणायाची कारवाई केली होती. सन २०२०च्या कालावधीत आशुतोष डुंबरे पुणे पोलीस आयुक्त म्हणून कार्यभार स्वीकारला. त्यावेळी त्यांनी जेष्ठ नागरिकांच्याबाबत संवेदनशील असल्याने अनेक उपाययोजना केल्या होत्या.