कळवा प्रभाग समितीत अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट
ठाणे : ठाणे पालिका आयुक्तालयाच्या हद्दीतील कळवा आणि दिवा परिसर आणि माजिवडा-मानपाडा प्रभाग समितीत अनधिकृत बांधकामांना पालिका प्रशासनाने कारवाईच्या पावित्र्यानंतर ब्रेक लागला होता. मात्र आता पुन्हा जल्लोषात बांधकामे सुरु झालेली आहेत. दरम्यान आर्थिक सेटिंग झाल्यामुळेच पुन्हा अनधिकृत इमारतींच्या बांधकाम सुरुवात झाल्याचा आरोप माहितीचा अधिकार कार्यकर्ती प्रियांका शाद यांनी केला आहे. आता पालिका आयुक्तांच्या आदेशाची अंमलबजावणी करीत पालिका अतिक्रमण विभाग बांधकामांवर कारवाई करणार काय? यावर संशयाचे धुके जमलेले आहेत.
दिवा प्रभाग समितीत अनेक ठिकाणी अनधिकृत इमारती सुरु आहेत. मात्र नव्याने सुरु झालेल्या इमारतीचे कामही दोन दिवसापासून धडाक्यात सुरु झालेले आहे. तर या बांधकामाच्या पैशांवरच पालिका अधिकारी आणि संबंधितांचा डोळा असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ता अमोल केंद्रे यांनी केला. तर पालिका प्रशासनाच्या अधिकाऱ्यांचे लक्ष अनधिकृत इमारतींच्या मलिद्याकडे आहे. दिव्यात वाहतूक, पाणी, रस्ते, साफसफाई, आरोग्य आदी सारख्या सुविधांचा अभाव आहे. नागरिक नरक यातना भोगताहेत त्याची फिकर दिवा प्रभाग समिती अधिकाऱ्यांना नसल्याचा आरोप केंद्रे यांनी केला.
कळवा प्रभाग समितीत अनधिकृत बांधकामाचा सुळसुळाट
कळवा प्रभाग समितीच्या हद्दीत सुरु असलेल्या अनधिकृत इमारतींना प्रभाग समितीच्या सहाय्यक आयुक्तांचा वरदहस्त असल्याचा आरोप होत आहे. चैतन्य सोसायटीच्या पुढे राजदीप हॉटेल जवळ, खारेगाव,येथे बिल्डर प्रकाश भडकवान यांचे बांधकाम सुरु आहे. कळवा टाकोळी मोहल्ला येथे चोळकर नावाच्या बिल्डरचे बांधकाम, विजया अभिलाषा अपार्टमेंट जवळ शास्त्रीनगर, कळवा येथे बांधकामाची तयारी सुरु आहे. तर नॅशनल बार कळवा येथेही बांधकाम सुरु आहे. या सर्व बांधकामाची सूचना पत्राद्वारे आणि तक्रारी सामाजिक कार्यकर्ती आणि माहितीचा अधिकार कार्यकर्ती प्रियांका शाद यांनी केलेल्या आहेत, मात्र प्रभाग समितीच्या माध्यमातून या तक्रारीची दाखल घेतली जात नसून केवळ कारवाईचा दिखावा करण्यात येत असलायचा आरोप शाद यांनी केला आहे.
पालिका आयुक्तांच्या निर्देशाचे काय?
ठाण्यात साईराज इमारत आणि लकी कंपाउंड इमारत कोसळल्यापासून ते आज पर्यंत शेकडो पेक्षा जास्त इमारती आणि तोवर उभे राहिले मात्र कारवाई करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे अनधिकृत इमारतीच्या बांधकामाबाबत पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी या अनधिकृत बांधकामांना त्या त्या विभागातील सहाय्यक आयुक्तांना जबाबदार धरणार असलयाचे सूतोवाच केले होते, त्या सहाय्यक आयुक्तांना दिलेल्या निर्देश हवेतच विरल्याचे चित्र आहे. ठाणे ऐतिहासिक शहरासोबतच आता अनधिकृत इमारतींचे शहर झालेले आहे.