महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून वायू प्रदूषण दिनानिमित्त कार्यक्रम

पनवेल महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन

पनवेल : दिनांक 2 डिसेंबर हा राष्ट्रीय वायु प्रदूषण दिन म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवरती आयुक्त गणेश देशमुख यांच्या सूचनेनूसार दिनांक सात डिसेंबर रोजी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 7 काळुंद्रे भिंगारी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते,तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र 10 रोहिंजण येथील  श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती  कार्यक्रम राबविण्यात आला.

वायू प्रदूषण हा जागतिक स्तरावर सर्वात मोठा पर्यावरणीय आरोग्याचा धोका मानला जातो, हवेच्या गुणवत्तेचा पृथ्वीच्या हवामानाशी जवळचा संबंध आहे आणि त्याचा आरोग्यावर परिणाम होतो. दरवर्षी २ डिसेंबर रोजी साजरा केला जाणारा राष्ट्रीय प्रदूषण दिन आपल्याला वायू प्रदूषणाच्या वाढत्या धोक्याची आठवण करून देतो, म्हणूनच दरवर्षी २ डिसेंबर ते ८ डिसेंबर या कालावधीत वायू प्रदूषणाने होणाऱ्या आरोग्या वरील परिणामा बद्दल जागरूकता वाढवण्याच्या दृष्टीने विविध जनजागृतीपर कार्यक्रम राबविले जातात. या पार्श्वभूमीवरती मुख्य वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. आनंद गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सात डिसेंबर रोजी महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र सात काळुंद्रे भिंगारी येथे स्वच्छता मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते,तसेच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र दहा रोहिंजण येथील  श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती  कार्यक्रम राबविण्यात आला.यावेळी डॉ. सारू गुप्ता, साथरोग अधिकारी डॉ. आकाश ठसाळे, डॉ. वैभवी निंबाळकर, डॉ. शुभांगी गोस्वामी, परिचारिका गीता कुरूकले,इतर परिचारिका, कर्मचारी उपस्थित होते.

 वायु प्रदूषणाला आळा घालण्याची जबाबदारी ही सामूहिक असून १९८९ मध्ये सुरू झालेल्या या दिवसाचे उद्दिष्ट महत्त्वपूर्ण रणनीतीवर प्रकाश टाकणे हे आहे. या दिवसाचे औचित्य साधून राष्ट्रीय कार्यक्रम हवामान बदल आणि मानवी आरोग्य कार्यक्रमांतर्गत एकत्र येऊन"आपल्या ग्रहाचे रक्षण" या एकमेव उद्देशाने महापालिकेच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

कळवा दिव्यात अनधिकृत बांधकामे झाली पुन्हा सुरु