विकसित भारत संकल्प यात्रेस आज ठाणे रेल्वे स्थानक येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पोहचविण्यात येणाऱ्या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा -- सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण

ठाणे  : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली आपला देश महासत्तेच्या दिशेने वाटचाल करीत आहे, यासाठी देशातील 130 कोटी जनतेने एक पाऊल पुढे टाकले पाहिजे. एक पाऊल पुढे टाकणे म्हणजे देशातील प्रत्येक नागरिकाला विकासाच्या झोतामध्ये आणणे ही आपली प्राथमिक गरज आहे, यासाठी पंतप्रधानानी ज्या योजना तयार केल्या आहेत त्या योजनांचा लाभ समाजातील प्रत्येक व्यक्तीपर्यंत पोहचविण्यासाठी ही विकसित भारत संकल्प यात्रा सुरू केली आहे, या यात्रेचा लाभ सर्व नागरिकांनी घ्यावा असे आवाहन सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी आज ठाण्यात केले.

ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत विविध शिबिरांचे आयोजन आज ठाण्यातील ठाणे रेल्वे स्थानक येथे करण्यात आले होते. या यात्रेत आज मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबिरार्थींची ऑनलाईन प्रणाली मार्फत संवाद साधला.

यावेळी  आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे,  अतिरिक्त आयुक्त (1) श्री. संदीप माळवी, उपायुक्त जी.जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे,  सहाय्यक आयुक्त भाईक, माजी नगरसेवक संजय वाघुले, भरत चव्हाण , संदीप लेले यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते. त्यांनी शिबिरातील सर्व स्टॉलना भेटी देऊन योजनांचे स्वरुप, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांची माहिती घेतली.

ठाणे महानगरपालिका राबवित असलेल्या योजना त्या योजनांसाठी पात्र असलेल्या सर्व नागरिकांपर्यंत या विकसित भारत संकल्प यात्रेच्या माध्यमातून पोहचविण्यात येणार आहेत, या योजनांचा लाभ घेवून नागरिकांनी या सशक्त भारत घडविण्यास हातभार लावावा असेही मंत्री रविंद्र चव्हाण यांनी यावेळी नमूद केले. तसेच आमदार संजय केळकर, निरंजन डावखरे यांनी देखील नागरिकांशी संवाद साधत या यात्रेच्या माध्यमातून सर्व योजना नागरिकांपर्यंत पोहचाव्यात यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत असे आवाहन उपस्थितांना केले.

कार्यक्रमाच्या ठिकाणी पी एम उज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी व अपग्रेडेशन, पी एम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन, ई- बस अशा विविध  शासकीय योजनांची माहिती या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर देण्यात आली. आरोग्य शिबीर, क्षयरोग तपासणी व औषधोपचार शिबीर असे विविध उपक्रम राबविण्यात आले. केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सुरू झालेली  विकसित भारत संकल्प यात्रा 26 जानेवारी २०२४ पर्यंत ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभागसमितीतील विविध ठिकाणी सुरू राहणार आहे. या कार्यक्रमासाठी डिजिटल स्क्रीन असलेला रथ सज्ज करण्यात आला आहे.

तसेच ठामपा क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा रथ दररोज विविध ठिकाणी जात असून या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जात आहे. तसेच  गरजू लाभार्थ्यांचा शोध घेणे, त्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हे उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबविले जात असून याला नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.  

 तसेच दुपारी न्यू प्रभात नगर, गांवदेवी येथे आयोजित केलेल्या विकसित संकल्प यात्रेसही नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळाला.

विकसित भारत संकल्प यात्रेचे वेळापत्रक

10 डिसेंबर - स. 9.30 ते  दु. 1.30 – घंटाळी नाका, ठाणे प.
                      दु. 2.30 ते सायं. 5.30 –टायटन शोरूमसमोर, नौपाडा

11 डिसेंबर - स. 9.30 ते  दु. 1.30 – मल्हार सिनेमासमोर, नौपाडा
                      दु. 2.30 ते सायं. 5.30 –हरिनिवास सर्कल

12 डिसेंबर - स. 9.30 ते  दु. 1.30 – कोरस टॉवर, लोकनान्य नगर
                      दु. 2.30 ते सायं. 5.30 –लोकमान्य नगर बस स्टॉप

13 डिसेंबर - स. 9.30 ते  दु. 1.30 – इंदिरा नगर
                      दु. 2.30 ते सायं. 5.30 –राम नगर चौक

14 डिसेंबर - स. 9.30 ते  दु. 1.30 – साठे नगर चौक
                      दु. 2.30 ते सायं. 5.30 –कामगार नाका

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

आता ‘एनएमएमटी'मध्ये मोबाईल वापरावर निर्बंध