‘माझी वसुंधरा अभियान' ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड' स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज

नवी मुंबई : ‘माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत नवी मुंबई महापालिका राज्यातील क-वर्ग महापालिकांमध्ये प्रथम क्रमांकाचे पर्यावरणशील शहर म्हणून मानांकित असून यावर्षीही अधिक उत्तम कामगिरी करण्याचे ध्येय नजरेसमोर ठेवून नवी मुंबई महापालिका सज्ज झालेली आहे. या अनुषंगाने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी आढावा बैठक घ्ोत पंचतत्वांमधील प्रत्येक तत्वावर आधारित अपेक्षित कामांचा बाबनिहाय आढावा घेतला. तसेच कार्यवाहीत प्रभावीपणा आणि गतिमानता आणण्याचे निर्देश दिले. याप्रसंगी अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले, विजयकुमार म्हसाळ आणि संबंधित विभागप्रमुख, अधिकारी उपस्थित होते.

‘माझी वसुंधरा अभियान' अंतर्गत नागरिकांपर्यंत अभियानाची माहिती पोहोचणे गरजेचे असून नागरिकांनी ‘माझी वसुंधरा अभियान'ची शपथ https://majhivasundhara.in/en/lets-pledge घेऊन अभियानात उत्साहाने सहभागी होणे अपेक्षित आहे. या दृष्टीने नागरिकांपर्यत ई-शपथची लिंक पोहोचवून त्यांनी शपथ घेऊन शपथ घेतल्याचे प्रमाणपत्र प्राप्त करुन घेण्याबाबत नागरिकांना व्यापक प्रमाणात प्रोत्साहित करावे, असे आयुक्त नार्वेकर यांनी सर्व अधिकारी, कर्मचारी यांना निर्देश दिले आहेत.

अभियान मध्ये भूमी, वायू, जल, ऊर्जा, आकाश या पंचतत्वांच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविणेबाबत सूचित करतानाच व्यापक लोकसहभागावर भर द्यावा. एनर्जी ऑडीट आणि वॉटर ऑडीट विहीत कालावधीत करुन घेण्याचीही खबरदारी घ्यावी, असे आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सूचित केले आहे.

भूमी तत्वाच्या अनुषंगाने वृक्षारोपण एक महत्वाचा मुद्दा असून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करताना जैवविविधता राखली जाईल अशी देशी झाडांची लागवड करावी. त्याचप्रमाणे वृक्षारोपणात कमी जागेत दाट वृक्षरोपांची मियावाकी पध्दतीने लागवड करुन शहरी जंगल विकसीत करण्यावर भर द्यावा. अशाच प्रकारे इतरही चार तत्वांच्या अनुषंगाने करावयाच्या कामाचा आयुवतांनी सविस्तर आढावा घेत सदर कामे जलद करण्याचे निर्देशित केले.

शहर सुशोभिकरणात उद्योजक, व्यावसायिक यांचाही सहभाग असावा आणि त्यांच्या माध्यमातून परिसरातील सार्वजनिक जागा, दुभाजक यांचे सुशोभिकरण करण्यात येऊन शहर सुशोभिकरणाला वेग आणण्यासाठी आवाहन करावे. याबाबतच्या अंमलबजावणीकरिता महापालिका स्तरावर समिती स्थापन करण्यात यावी. त्यांच्या माध्यमातून शहर सुशोभिकरणासाठी पुढाकार घेणाऱ्या संस्था, उद्योजक, व्यावसायिक यांना निमंत्रित करण्यात यावे, असे आयुवतांनी सांगितले.

दरम्यान, ‘माझी वसुंधरा अभियान' प्रमाणेच यावेळी ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड स्पर्धा' यामध्ये नवी मुंबई महापालिका सहभागी झाली असून त्यामध्येही सर्वोत्तम कामगिरी करण्यासाठी आवश्यक असलेल्या कार्यवाहीचा सविस्तर आढावा आयुवत राजेश नार्वेकर यांच्या मार्फत घेण्यात आला.

नवी मुंबई शहरात नियोजित असलेल्या ‘विकसित भारत-संकल्प यात्रा' मोहिमेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पूर्वनियोजन करावे. कोणत्याही राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय उपक्रमात सहभागी होवून सर्वोत्तम कामगिरी करण्याची अपेक्षा महापालिकेकडून सर्व स्तरांतून केली जाते. त्यादृष्टीने प्रत्येक घटकाने सतर्क राहून आपापली जबाबदारी काटेकोरपणे पार पाडावी. -राजेश नार्वेकर-आयुवत-नवी मुंबई महापालिका. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

विकसित भारत संकल्प यात्रेस आज ठाणे रेल्वे स्थानक येथे नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद