मुंबई महानगर क्षेत्रात डॉक्टराने ३०० रोबोटिक नी-रिप्लेसमेंट सर्जरी करण्याची पहिलीच वेळ

१७ महिन्यात २८७ यशस्वी रोबोटोक नी-रिप्लेसमेंट सर्जरी
 

नवी मुंबई : फोर्टीस-हिरानंदानी हॉस्पिटल वाशी येथील ऑर्थोपेडिक सर्जरीचे संचालक डॉ. प्रमोद भोर आणि त्यांच्या टीमने १७ महिन्यांमध्ये २८७ यशस्वी रोबोटिक नी-रिप्लेसमेंट सर्जरी करण्याचा उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. मुंबई महानगर क्षेत्रात पहिल्यांदाच सदर उपलब्धी असल्याचा दावा करण्यात आला आहे.

मार्च २०२२ मध्ये सुरु झाल्यापासून फोर्टीस हॉस्पिटल येथील रोबोटिक नी-रिप्लेसमेंट प्रोग्रामला चांगलेच यश मिळाले आहे. या प्रोग्राममुळे गुडघ्ोदुखी आणि सांधेदुखीच्या समस्यांनी ग्रस्त अनेक रुग्णांचे जीवन सुधारले आहे. रोबोटिक नी-रिप्लेसमेंट सर्जरीचे प्रौढ आणि तरुण रूग्णांना मोठ्या प्रमाणात फायदे झाले असले तरी आघात किंवा रुमेटॉइड आर्थरायटिस (संधिवात) यामुळे सेकंडरी ऑस्टीओआर्थरायटिस झालेल्या तरुणांमध्ये या सर्जरीचा वापर मर्यादित आहे. फोर्टीस हिरानंदानी हॉस्पिटलची सीयुव्हीआयएस-सर्जिकल रोबोट सिस्टम या अत्याधुनिक पूर्णतः ऑटोमेटेड रोबोटिक आर्मने पूर्ण आणि अंशतः नी-रिप्लेसमेंट सर्जरींमध्ये क्रांतिकारी बदल घडवून आणला आहे. अधिक अचूक आणि कमी इन्वेसिव्ह उपचारपध्दतीसह या तंत्रज्ञानामुळे रुग्ण गुडघ्याशी संबंधित समस्यांमधून लवकर बरे झले आहेत. या सिस्टमची अचुकता आणि किमान इन्वेसिव्ह स्वरुपामुळे रिकव्हरी कालावधीत ३० टक्के कपात झाली आहे, ज्यामुळे रुग्ण लवकरात लवकर त्यांचे दैनंदिन नित्यक्रम करु शकतात. तसेच रिकव्हरीसाठी लागणारा कालावधी पारंपारिक शस्त्रक्रिया पध्दतींच्या तुलनेत अर्ध्यापर्यंत कमी होतो.

पारंपारिक नी-रिप्लेसमेंट सर्जरीमध्ये हाताने उपकरणांची हाताळणी करावी लागत असल्यामुळे मर्यादा येऊ शकतात. कधी-कधी सर्जन्सना अधिक हाडे कट करावी लागतात. त्यामुळे ऊतींचे नुकसान होऊ शकते. याउलट सीयुव्हीआयएस- सर्जिकल रोबोट सिस्टम अचूक आणि किमान इन्वेसिव्ह उपचारपध्दतीची खात्री देते, असे डॉ. प्रमोद भोर यांनी सांगितले.  

सदरचे तंत्रज्ञान आम्हाला चांगले नियोजन करण्यास मदत करते आणि हातापायांचे सीटी स्कॅन्स एकूण शरीररचना समजण्यास मदत होते. आम्ही या स्कॅन्सचा वापर करत व्हर्च्यअल सर्जरीचे, तसेच इम्प्लान्ट प्लेसमेंट आणि बोन कटस्‌चे नियोजन करतो. पूर्णतः ऑटोमॅटिक रोबो हाडांमधील ऊतींचे बारकाईने कटींग करण्यामध्ये मदत करतो. तसेच सांध्यामध्ये इम्प्लान्ट परिपूर्णपणे फिट करण्यामध्ये देखील मदत करतो. या उपचारपध्दतीमुळे रक्त संक्रमणाची गरज कमी होते आणि शस्त्रक्रियेनंतर वेदना देखील होत नाहीत, असे डॉ. प्रमोद भोर म्हणाले. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘माझी वसुंधरा अभियान' ‘मुख्यमंत्री सक्षम वॉर्ड' स्पर्धेसाठी नवी मुंबई सज्ज