पनवेल महापालिकेच्या ४१ संवर्गातील 3७७ विविध पदांची परीक्षा आजपासून सुरु

५७ केंद्रांवर परीक्षा; ५५ हजार २१४ उमेदवार

पनवेल : पनवेल महापालिका मधील ४१ संवर्गातील ३७७ विविध पदांची ऑनलाइन परीक्षा ८ डिसेंबर पासून सुरु झाली असून, परीक्षा चार दिवस विविध केंद्रांवर सुरु असणार आहे. दरम्यान, पनवेल महापालिका आयुक्त तथा प्रशासक गणेश देशमुख यांनी रसायनी येथील पिल्लई एचओसीएल कॅम्पस या परीक्षा केंद्राला ८ डिसेंबर रोजी सकाळी भेट देऊन परीक्षा केंद्राची पाहणी करुन सर्व आवश्यक सोयी सुविधा अद्यावत असल्याची खातरजमा केली.


पनवेल महापालिकेच्या भरती परीक्षा पध्दती सुरळीत पार पाडण्याच्या दृष्टीने पनवेल महापालिका मुख्यालय येथे कंट्रोल रुम तयार करण्यात आला आहे. या कंट्रोल रुम मध्ये टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस कंपनींचे प्रतिनिधी तसेच विभागीय समन्वयक, महापालिका अधिकारी-कर्मचारी सकाळी ७ पासून दिवसभर कार्यरत होते.
परिक्षा केंद्रांवर येणाऱ्या कोणत्याही तक्रारींचे तात्काळ निराकरण या महापालिका मुख्यालय कंट्रोल रुममधून करण्यात येत आहे. ८ डिसेंबर रोजी परिक्षा ५७ केंद्रांवर सुरळितपणे घ्ोण्यात आली. प्रत्येक परिक्षा केंद्रांवर पोलीस व्यवस्था, मोबाईल जॅमर, वैद्यकीय सुविधा, पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती.
राज्यभरात ५७ विविध केंद्रांवर होणाऱ्या परीक्षेला ५५ हजार २१४ उमेदवार बसले आहेत. या परीक्षेवरील नियंत्रणासाठी ५७ राजपत्रित अधिकाऱ्यांसोबत ४४१ अधिकारी-कर्मचारी यांच्या परीक्षा केंद्रांवर नेमणुका पनवेल महापालिका मार्फत करण्यात आल्या आहेत. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी मधील नेताजी सुभाषचंद्र बोस क्रिडांगणाची दुरवस्था