चैत्यभूमी येथे मोफत भोजन वाटप, अल्प दरात पुस्तके वाटप

सामाजिक न्याय विभागाच्या उपक्रमास जनतेचा चांगला प्रतिसाद

नवी मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६७ व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्याच्या सामाजिक न्याय विभाग मार्फत दादर येथील शिवाजी पार्क येथील मोफत भोजन वाटप आणि अल्प दरात पुस्तके वाटप कार्यक्रम ५ आणि ६ डिसेंबर रोजी झाला. या उपक्रमाला जनतेने चांगला प्रतिसाद दिला, अशी माहिती समाजकल्याण विभागाच्या प्रादेशिक उपायुक्त वंदना कोचुरे यांनी दिली.

यावर्षी सुमारे ६० हजार लोकांना मोफत भोजन आणि पाणी बॉटलचे वाटप करण्यात आले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन-प्रशिक्षण संस्था बार्टी, पुणे यांच्या मार्फत पुस्तक स्टॉल उभारण्यात आला होता. या स्टॉल वर पुस्तक खरेदीवर ८५ % सूट देण्यात आली होती. याला लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळून पुस्तक खरेदी करण्यासाठी लोकांची गर्दी पहावयास मिळाली. भारताचे संविधान, बुध्द आणि धम्म, तसेच बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित पुस्तके खरेदी करण्यावर लोकांचा कल होता.

सदर उपक्रम सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, महासंचालक सुनिल वारे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन- प्रशिक्षण संस्था, बार्टी-पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या उपक्रमास समाज कल्याण सहा. आयुक्त प्रसाद खैरनार (मुंबई शहर), सहा.आयुक्त  समाधान इंगळे (ठाणे), सहा. आयुक्त सुनिल जाधव (रायगड), आदि अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

पनवेल महापालिकेच्या ४१ संवर्गातील 3७७ विविध पदांची परीक्षा आजपासून सुरु