पामबीच मार्गावर तिहेरी वाहन पार्किंग

‘बेकायदा वाहन पार्किंग'मुळे वाहतुक कोंडीत भर?

वाशी : पामबीच मार्गावर पावणेश्वर उड्डाण पूल ते हनुमान मंदिर पर्यंत स्थनिक वाहन विक्रेत्यांकडून बेकायदा वाहन पार्किंग केली जाते. यास वाहतुक पोलीस शाखेचा आशीर्वाद भेटत असल्याने आता तिहेरी वाहन पार्किंग पर्यंत या वाहन विक्रेत्यांची मजल गेली आहे. मात्र, या तिहेरी वाहन पार्किंग मुळे या ठिकाणी अपघाताची दाट शक्यता बळावली आहे.

पावणेश्वर उड्डाण पूल, कोपरी गाव ते वाशी सेक्टर-१७ अरेंजा कॉर्नर दरम्यान दुतर्फा ‘नो पार्किंग झोन' घोषित करण्यात आला आहे. मात्र, नो पार्किंग झोन असून देखील कोपरी गाव येथील वाहन विक्री दुकानदार त्यांची वाहने भर रस्त्यात उभी करुन वाहतुकीस अडथळा निर्माण करत असल्याने वाहतुक कोंडीत भर पडत चालली आहे. पावणेश्वर उड्डाण पूल, कोपरी गाव ते वाशी सेक्टर-१७ अरेंजा कॉर्नर दरम्यान विक्रीसाठी वाहने  थेट पदपथ आणि रस्त्यावर दुहेरी रांगेत उभी केली जात असताना आता तिहेरी रांगेत देखील वाहने उभी केली जात आहेत. त्यामुळे या रस्त्यात इतर वाहनांना वाट काढताना मोठा अडथळा निर्माण होत असून, या ठिकाणी अपघाताची शक्यता बळावली आहे. यासंदर्भात वाहनधारकांनी अनेकदा तक्रारी केल्या आहेत. मात्र, वाहन विक्रेत्यांना वाहतुक पोलीस विभागाचा आशीर्वाद भेटत असल्याने या ठिकाणी फक्त कारवाईचा फार्स केला जातो. प्रत्यक्षात ठोस कारवाई होत नसल्याने वाहन चालकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. 

 

--

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

नेरुळ येथील अनधिकृत कृष्णा कॉम्फ्लेक्स व त्रिमुर्ती पार्कचा विषय अधिवेशनात गाजणार