वाशी येथे ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'ला सुरुवात

प्रदर्शनाचे सिडको एमडी डिग्गीकर, अभिनेत्री राकुल प्रीत सिंह यांच्या हस्ते उद्‌घाटन

नवी मुंबई : बिल्डर असोसिएशन ऑफ नवी मुंबई (बीएएनएम) आणि कॉन्फेडरेशन ऑफ रिअल इस्टेट डेव्हलपर्स असोसिएशन ऑफ इंडिया (क्रेडाई) यांच्या वतीने वाशी येथील सिडको एविझबिशन सेंटर मध्ये २२ वे ‘मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन' आयोजित करण्यात आले आहे. या ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'चे उदघाटन १ डिसेंबर रोजी ‘सिडको'चे व्यवस्थपकीय संचालक अनिल डिग्गीकर आणि सिने अभिनेत्री राकुल प्रीत सिंह यांच्या हस्ते रिबीन कापून करण्यात आले. प्रॉपर्टी प्रदर्शन येत्या ४ डिसेंबर पर्यत सकाळी १० ते ९ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.

याप्रसंगी ‘बीएएनएम'चे अध्यक्ष वसंत भद्रा, सेक्रेटरी जिगर त्रिवेदी, भुपेंद्र शहा, विकी थॉमस, खजिनदार करण सबलोक, ‘सिडको'च्या जनसंपर्क अधिकारी प्रिया रातांबे, संयोजक शैलेश पटेल, प्रवीण पटेल, हितेश गामी, महेश पटेल, सह-संयोजक झुबिन संघोई, ‘पॅराडाईज ग्रुप'चे मधू भतिजा, मनिष भतिजा आणि इतर पदाधिकारी-सदस्य उपस्थित होते.
नवी मुंबई भविष्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर बनणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील घराच्या किंमती आणखी वाढतील. नवी मुंबईतील नागरिकांना एकाच छताखाली घर घेण्यासाठी असणारी संधी ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'द्वारे मिळणार आहे. त्यामुळे नवी मुंबईतील घर घेण्याचे स्वप्न असणाऱ्या नागरिकांनी या प्रदर्शनाला नवकीच भेट देऊन नवी मुंबईमधील भविष्यातील इन्फ्रास्ट्रक्चरची माहिती घ्यावी, असे आवाहन ‘सिडको'चे व्यवस्थापकीय संचालक अनिल डिग्गीकर यांनी यावेळी केले.

तर नवी मुंबई मध्ये एकाच छताखाली घर घेण्स्वयाचे प्न पाहणाऱ्या नागरिकांना ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये घर घेण्याची संधी उपलब्ध झाली आहे. एकंदरीतच ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'मधील विविध गृहनिर्माण प्रकल्पांच्या स्टॉलला भेट दिली असता बिल्डरांनी देऊ केलेल्या सोयी-सुविधा बघता नवी मुंबईचे इन्फ्रास्ट्रक्चर खूप चांगले असल्याची भावना सिने अभिनेत्रीसकल प्रीत सिंह हिने बोलून दाखवली.

या ‘मेगा प्रॉपर्टी प्रदर्शन'मध्ये लहान-मोठ्या विकासकांनी जवळपास ५०० गृहनिर्माण प्रकल्पांचे सादरीकरण केले आहे. यामध्ये २० लाखांपासून ते १५ कोटी पर्यंतची घरे ग्राहकांना एकाच छताखाली विक्रीसाठी उपलब्ध करुन देण्यात आली आहे. यात विशेषत्वाने खारघर, तळोजा, पुष्पकनगर, द्रोणागिरी, उरण, उलवे, पामबीच, एनआरआय, सानपाडा, नेरळ, खोपोली, कर्जत, रोहिंजण, पनवेल, आदि ठिकाणच्या महत्वाकांक्षी गृहप्रकल्पांचा समावेश आहे. त्यामुळे नागरिकांनी ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'चा लाभ घ्यावा, असे आवाहन ‘बीएएनएम'चे अध्यक्ष वसंत भद्रा यांनी केले आहे.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

२८ व्या संगीतभूषण पं. राम मराठे स्मृती संगीत सोहळ्यास आरंभ