उरण येथे आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सव २०२३ चे आयोजन

नविन शेवा येथे आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सव २०२३ चे आयोजन

उरण : शांतेश्वरी आई सामाजिक संस्था उरण नवीन शेवा तर्फे २ डिसेंबर ते  १० डिसेंबर २०२३ दरम्यान सांयकाळी ६:३० ते रात्री १० पर्यंत शांतेश्वरी मैदान, शिवराय चौक,नवीन शेवा,द्रोणागिरी, उरण येथे आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सव २०२३ चे आयोजन करण्यात आले आहे. आई शांतेश्वरी सामाजिक संस्था उरण नविन शेवा तर्फे हे महोत्सव पहिल्यांदाच साजरे केले जात आहे. शनिवार दिनांक २ डिसेंबर २०२३ रोजी सांयकाळी ६:३० वाजता मंगळागौरी व पारंपारिक पारंपारिक फेर नृत्य स्पर्धा, रविवार दि ३ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता स्टेप आर्ट निर्मित दिव्या कदम प्रस्तूत श्रृंगार रस लावण्यांचा,सोमवार दि. ४ डिसेंबर २०२३ सायंकाळी ६:३० वा महाराष्ट्राची लोक‌धारा, मंगळवार ५ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:३०वा. स्टेप आर्ट निर्मित नृत्य आणि हास्याचा नजराणा - जल्लोष सुवर्ण युगाचा, बुधवार दि ६ डिसेंबर २०२३ रोजी सायंका ६:३० वा. कराओके गायन आणि नृत्य,गुरुवार दि ७ डिसेंबर २०२३ रोजी सायं ६:३० वा. एकेरी नृत्य नृत्य स्पर्धा, शुक्रवार ८ डिसेंबर २०२३ रोजी संध्याकाळी ६:३० वा.मिस रायगड स्पर्धा, शनिवार दिनांक ९ डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:३० वा. महाराष्ट्रातील गाजलेले ग्रुप डान्स, रविवार दि १० डिसेंबर २०२३ रोजी सायंकाळी ६:३० नितेश म्हात्रे आणि सन्नी संते प्रस्तुत ही दौलत आगरी कोल्यांची सेलिब्रीटी शो असे विविध स्पर्धा, उपक्रम या आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सवात संपन्न होणार आहेत. शनिवार दिनांक २ डिसेंबर २०२३ ते रविवार १० डिसेंबर २०२३ दरम्यान शांतेश्वरी मैदान, जय शिवराय चौक, नवीन शेवा, उरण येथे सायंकाळी ६:३० ते रात्री १० या वेळेत आई शांतेश्वरी सामाजिक संस्था नवीन शेवा उरण तर्फे आयोजित करण्यात आलेल्या आगरी कोळी द्रोणागिरी महोत्सवला नागरिकांनी, रसिक प्रेषकांनी मोठया संख्येने भेट देऊन विविध स्पर्धा, कार्यक्रमांचा लाभ घ्यावा असे आवाहन आई शांतेश्वरी सामाजिक संस्था नवीन शेवा उरणच्या वतीने करण्यात आले आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी येथे ‘प्रॉपर्टी प्रदर्शन'ला सुरुवात