दूषित पाण्यामुळे जुहूगाव मधील तलावात मृत माशांचा खच

 जुहूगाव तलावात शेवाळ, पाणवनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ

वाशी ः जुहूगाव मध्ये मध्यभागी असलेल्या गावकीच्या तलावाच्या स्वच्छतेकडे नवी मुंबई महापालिकेने पाठ फिरवल्याने तलावात हिरवळीसह घाणीचे साम्राज्य पसरले असून, तलावातील पाणी दूषित झाले आहे. दूषित पाण्यामुळे वारंवार तलावातील मासे मृत्युमुखी पडत असून, तलाव परिसरात दुर्गंधी पसरत आहे.

जुहूगाव गावाच्या मध्यभागी असलेल्या तलावात नेहमीच घाणीचे साम्राज्य पसरलेले असते. त्यामुळे महापालिका प्रशासनाने २०२२ मध्ये या तलावाची साफसफाई करुन सुधारणा व्ोÀली होती. यासाठी महापालिव्ोÀने २४ लाख रुपये खर्ची घातले होते. मात्र, २४ लाख रुपये खर्च करुन देखील जुहूगाव मधील तलावात शेवाळ आणि पाणवनस्पतींची मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे तलावातील पाण्याला दुर्गंधी येत असूून, रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली असतानाही या तलावातील शेवाळ आणि पाणवनस्पती काढण्याकडे महापालिकेने पाठ फिरवल्याने तलावाला हिरव्या रंगाचे स्वरुप प्राप्त झाले आहे.

नवी मुंबई शहरातील इतर गावामधील तलाव स्वच्छ आणि देखणे असताना जुहूगाव मधील तलावाचे मूळ रुपडे पालटून गेले आहे. जुहूगावातील ग्रामस्थांकडून श्री गणेश विसर्जन याच तलावात केले जाते. त्यामुळे जुहूगाव ग्रामस्थांनी वारंवार तलाव स्वच्छ करण्याबाबत तक्रारी देखील केल्या आहेत. महापालिका तलाव स्वच्छ करत नसल्याने दोन वेळा ग्रामस्थांनी श्रमदानातून तलाव स्वच्छता मोहीम देखील राबविली आहे. मात्र, आता पुन्हा जुहूगाव मधील तलावात शेवाळ आणि कचरा जमा झाला असून, डासांची उत्पत्ती वाढली असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. तसेच या तलावात गावातील मलनिःसारण वाहिन्यांच्या गळतीचे पाणी येत असल्याचा संशय जुहूगाव ग्रामस्थांना आहे. तलावाच्या आजूबाजूला नागरी वस्ती आहे. महापालिका द्वारे तलावाच्या सुरक्षिततेसाठी सुरक्षा रक्षकांची नेमणूक देखील करण्यात आली आहे. मात्र, सुरक्षा रक्षकांकडून दुर्लक्ष होत असल्याने तलावात थेट कचरा टाकला जात आहे. परिणामी वारंवार कचरा टाकण्यात येत असल्याने मोठ्या प्रमाणात तलावातील मासे मृत पावले आहेत. त्यामुळे जुहूगाव मधील तलावाची साफसफाई करुन येथील सुरक्षा अधिक कडक करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते किशोर पाटील यांनी केली आहे.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रकल्पग्रस्त ठेकेदारांच्या प्रश्नावर सिडको सकारात्मक