‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला वागळे सर्कल येथे ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

‘ड्रोनदीदी' योजनेचा शुभारंभ

ठाणे ः ठाणे महापालिका क्षेत्रातील विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत विविध शिबिरांचे आयोजन ३० नोव्हेंबर रोजी ठाणे शहरातील वागळे सर्कल आणि आशर आयटी पार्क येथे करण्यात आले होते. या यात्रेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शिबिरार्थींशी ऑनलाईन प्रणाली मार्फत संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विकसित भारत संकल्प यात्रेबद्दल शिबिरार्थींशी चर्चा करत त्यांची मते जाणून घ्ोतली. तसेच या योजनांचा लाभ घ्ोणाऱ्या लाभार्थींची मते जाणून घ्ोतली.

या कार्यव्रÀमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘ड्रोनदीदी' या योजनेचा शुभारंभ ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून व्ोÀला. तसेच १० हजाराव्या प्रधानमंत्री जनऔषधी केंद्राचे लोकार्पण देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पध्दतीने केले. वागळे सर्कल आणि आशर आयटी पार्क येथील ‘विकसित भारत संकल्प यात्रा'ला ठाणेकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
याप्रसंगी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त जी. जी. गोदेपुरे, शंकर पाटोळे, वर्षा दिक्षीत, सहाय्यक आयुक्त समीर जाधव आदी उपस्थित होते. त्यांनी शिबिरातील सर्व स्टॉलना भेटी देऊन योजनांचे स्वरुप, लाभार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सेवा यांची माहिती घ्ोतली.

कार्यक्रमाच्या ठिकाणी पी एम उज्वला, आयुष्यमान भारत कार्ड, आधार कार्ड नोंदणी आणि अपग्रेडेशन, पी एम स्वनिधी, प्रधानमंत्री आवास योजना अर्बन, ई- बस अशा विविध शासकीय योजनांची माहिती या ठिकाणी उभारण्यात आलेल्या स्टॉलवर देण्यात आली. तसेच आरोग्य शिबीर, क्षयरोग तपासणी आणि औषधोपचार शिबीर असे विविध उपक्रम राबविण्यात आले.
केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध योजनांचे लाभ योग्य त्या लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्याच्या उद्देशाने सुरु झालेली विकसित भारत संकल्प यात्रा २६ जानेवारी २०२४ पर्यंत ठाणे महापालिकेच्या नऊ प्रभाग समितीतील विविध ठिकाणी सुरु राहणार आहे. या कार्यक्रमासाठी डिजिटल स्क्रीन असलेला रथ सज्ज करण्यात आला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात विकसित भारत संकल्प यात्रा रथ दररोज विविध ठिकाणी जात असून, या माध्यमातून विविध शासकीय योजनांची प्रसिध्दी केली जात आहे. तसेच गरजू लाभार्थ्यांचा शोध घ्ोणे, लाभार्थ्यांना प्रत्यक्ष योजनांची माहिती देणे, त्यांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे, आदी उपक्रम अगदी तळागाळापर्यंत राबविले जात असून, या उपव्रÀमांना नागरिकांचा देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

शासकीय योजनांचे लाभ सर्व लक्ष्यित घटकांपर्यंत कालबध्द रीतीने पोहोचतील इतके सुनिश्चित करुन सरकारच्या प्रमुख योजनांची पूर्णता प्राप्त करण्याच्या उद्देशाने देशभरात 'विकसित भारत संकल्प यात्रा' काढण्यात येत आहे, असे ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे यांनी सांगितले.  
‘ड्रोनदीदी' योजनेचा शुभारंभ
ड्रोनदीदी या योजनेच्या माध्यमातून महिला स्वयंबचत गटामार्फत ड्रोन चालविण्याचे प्रशिक्षण महिलांना देण्यात येणार आहे. महिलाभिमुख विकास सुनिश्चित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातत्याने प्रयत्न केले आहेत. या दिशेने आणखी एक पाऊल उचलत 'पंतप्रधान महिला किसान ड्रोन केंद्र'चा अर्थात ‘ड्रोनदीदी' योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ३० नोव्हेंबर रोजी केला. याद्वारे महिला बचत गटांना (एसएचजी) ड्रोन प्रदान केले जाणार आहेत. ड्रोन तंत्रज्ञान महिलांना उपजीविकेसाठी वापरता येणार आहे. पुढील तीन वर्षांत महिला बचत गटांना १५ हजार ड्रोन पुरवले जाणार आहेत. महिलांना ड्रोन उडवण्याचे आणि वापरण्याचे आवश्यक प्रशिक्षणही दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे शेतीमध्ये तंत्रज्ञानाच्या वापराला प्रोत्साहन मिळणार आहे.

विकसित भारत संकल्प यात्रा अंतर्गत वागळे सर्कल आणि आशर आयटी पार्क येथे आयोजित केलेल्या शिबिरात नागरिकांना ऑनलाईन प्रणालीच्या माध्यमातून मार्गदर्शन करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी.
विकसित भारत संकल्प यात्रा माहितीपत्रकांचे वाटप नागरिकांना करताना ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त (२) प्रशांत रोडे, उपायुक्त शंकर पाटोळे, वर्षा दिक्षीत, सहाय्यक आयुक्त समीर जाधव. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दूषित पाण्यामुळे जुहूगाव मधील तलावात मृत माशांचा खच