वाशी प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रक्तदान शिबीर

२६/११ तील शहिदांना दिली मानवंदना

नवी मुंबई-:२६/११ तील शहिदांना दिली मानवंदना देण्यासाठी वाशीतील प्रादेशिक कार्यालयात  मंगळवार दिनांक २८ नोव्हेंबर रोजी रक्तदान शिबीर आयोजित केले होते. यावेळी माजी आमदार संदीप नाईक हे प्रमुख  पाहुणे म्हणून उपस्थित होते.

२६ नोव्हेंबर २००८ रोजी मुंबईवर दहशद वाद्यांनी हल्ला केला होता. या हल्ल्यात अनेक नागरिक मृत्यूमुखी पडले होते.तर या हल्ल्याला सडेतोड उत्तर देताना  भारतीय जवान व मुंबई पोलीस दलातील अधिकारी व कर्मचारी शहीद झाले होते.आणी या शहिदांना  सर्वच घटकांकडून मानवंदना देण्यात येते.वाशी येथील उपप्रादेशिक कार्यालयात  अधिकारी वर्गाने  व वाहन चालक मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान श्रेष्ठ दान हे ब्रीद वाक्य समोर ठेवून रक्तदान करत या शहिदांना अनोखी मानवंदना दिली. यावेळी  परिवहन  कर्मचारी आणि वाहन चालक मालक  प्रतिनिधी सामाजिक संस्थेच्या रक्तदात्यांनी  रक्तदान केले.याप्रसंगी  माजी आमदार  व भाजपा जिल्हाप्रमुख संदीप नाईक यांच्या हस्ते रक्त दात्यांना  प्रमाण पत्राचे वाटप करण्यात आले.यावेळी माजी नगरसेविका उषाताई भोईर ,उपप्रादेशिक अधीकारी हेमांगीनी पाटील,तसेच आरटीओ कर्मचारी व वाहन चालक मालक परिवहन प्रतिनिधी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकाऱ्यांकडून दिखाव्याची पाहणी?