वेतन बँक खाती एकाच बँकेत; महापालिकेच्या आर्थिक कामकाजात सुनियोजितपणा

अधिकारी-कर्मचारी यांनाही विविध सुविधांचा लाभ

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका क्षेत्रात दर्जेदार सेवासुविधा पुरविण्यासोबतच आर्थिक ताळेबंदही सुस्थितीत राखण्याकडे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांचे बारकाईने लक्ष आहे. त्यासोबतच सेवासुविधा पूर्ततेसाठी मनापासून काम करणाऱ्या महापालिका अधिकारी- कर्मचारी यांच्या प्रशासकीय बाबींकडेही विशेष लक्ष दिले जात आहे.

या अनुषंगाने नवी मुंबई महापालिका मधील सर्व अधिकारी-कर्मचारी यांचे वेतन एकाच बँकेतून व्हावे आणि या माध्यमातून कामकाजात सुनियोजितपणा यावा यादृष्टीने महापालिका अधिकारी-कर्मचारी यांच्या वेतनाचे बँक खाते आयडीबीआय बँकेमध्ये सुरु करण्यास नुकतीच महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी मंजूरी दिली असून, याबाबतचा सामंजस्य करार (शस्दीीह्‌ल्स् दि ल्ह्‌ीेूीह्‌ग्हु) नवी मुंबई महापालिका आणि आयडीबीआय बँक व्यवस्थापन यांच्यामध्ये करण्यात आला. याव्दारे महापालिका अधिकारी-कर्मचारीवृंदाला कोणतीही अतिरिक्त प्रिमियम रक्कम न भरता मोठ्या स्वरुपाचे लाभ मोफत उपलब्ध करुन देणारी नवी मुंबई महापालिका पहिलीच महानगरपालिका आहे.

नवी मुंबई महापालिका तर्फे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर आणि आयडीबीआय बँक तर्फे मुख्य महाव्यवस्थापक शशांक दिक्षीत यांनी सांमजस्य करारावर स्वाक्षरी केली. याप्रसंगी महापालिका मुख्य लेखा-वित्त अधिकारी सत्यवान उबाळे, उपायुवत (प्रशासन विभाग) शरद पवार, शहर अभियंता संजय देसाई, वैद्यकिय आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत जवादे, अतिरिक्त शहर अभियंता शिरीष आरदवाड, लेखाधिकारी दयानंद कोळी आणि आयडीबीआय बँकेचे नवी मुंबई वरिष्ठ क्षेत्रप्रमुख टोनी सॅबस्टिन, उप महाव्यवस्थापक तथा वाशी शाखाप्रमुख संजय कुमार उपस्थित होते.

नवी मुंबई महापालिका मुख्यालयात असलेल्या कार्यालयांतील अधिकारी-कर्मचारी यांची बँक खाती एका बँकेत आणि मुख्यालयाबाहेर असलेल्या कार्यालयांतील बँक खाती वेगवेगळया बँकांमध्ये होती. सदर बँक खाती एकाच बँकेत असतील तर महापालिकेस एक संस्था म्हणून आर्थिक व्यवहार करणे सोयीचे होईल आणि विविध सुविधांच्या स्वरुपात महापालिका अधिकारी-कर्मचारी यांनाही अधिकचा काही लाभ मिळू शकेल, अशी संकल्पना सत्यवान उबाळे यांनी मांडली होती. त्यास अनुसरुन विविध बँकांशी संपर्क साधून त्यांना प्रस्ताव सादर करण्याविषयी आवाहन करण्यात आले. यामध्ये प्राप्त १२ बँकांच्या प्रस्तावांचा अभ्यास करुन त्यामधील चार बँकांना अंतिम सादरीकरण करण्यास पाचारण करण्यात आले. याबाबतचे सादरीकरण महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या समक्ष होऊन त्यामधील सर्व अटी आणि शर्ती पूर्ण करणाऱ्या तसेच महापालिका अधिकारी-कर्मचारी यांना सर्वाधिक लाभ देणाऱ्या आयडीबीआय बँकेच्या प्रस्तावास संमती देण्यात आली. त्यास अनुसरुन बँकेसोबत सामंजस्य करार करण्यात आलेला आहे.

यापुढील एक ते दीड महिन्याच्या कालावधीत नवी मुंबई महापालिका आस्थापनेवर कार्यरत सर्व अधिकारी-कर्मचारी तसेच तात्पुरत्या स्वरुपात ठोक मानधनावर कार्यरत कर्मचारी यांचीही बँकखाती उघडण्यासाठी आवश्यक माहिती संकलित केली जाणार असून, प्रत्येकाचे व्यक्तिगत सेव्हिंग खाते आयडीबीआय बँकेत सुरु करण्यात येणार आहे.

बँक मध्ये खाते उघडल्यानंतर महापालिका अधिकारी-कर्मचारी यांना विविध सुविधांचे लाभ बँकेमार्फत देण्यात येणार आहेत. यामध्ये २ लक्ष रुपये रवकमेचा कॅशलेस ग्रुप इन्शुरन्स दिला जाणार असून, दुर्दैवाने अपघाती मृत्यू झाल्यास वैयक्तिक अपघात विमा १ कोटी रक्कमेपर्यंत ऑन डयुटी/ऑफ डयुटी लागू असणार आहे. इतक्या मोठ्या स्वरुपाचा लाभ कर्मचाऱ्यांकडून कोणताही अतिरिक्त प्रिमीयम भरुन न घेता मोफत उपलब्ध करुन देणारी नवी मुंबई महापालिका पहिली महापालिका आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

वाशी प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने रक्तदान शिबीर