हिरानंदानी इस्टेटमध्ये मीटर बॉक्सला आग
ठाण्याच्या पातलीपाडा परिसरात व्हिला ग्रँड सोसायटी, इमारतीच्या तळ मजल्यावर मीटर बॉक्सला आग
ठाणे : ठाण्याच्या हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा परिसरात व्हिला ग्रँड सोसायटी, इमारतीच्या तळ मजल्यावर मीटर बॉक्सला आग लागली. या आगीत एक मीटर आणि वायरिंग जळून खाक झाल्याची घटना रविवार (२६ नोव्हेंबर) २०२३ रोजी सकाळी ९-२६ वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने मीटर बॉक्समधील अन्य मीटर वाचले अन्यथा अन्य मीटरची पेटले असते. यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही.
ठाण्याच्या घोडबंदर रोडवरील व्हिला ग्रँड सोसायटी, न्यू होरायझन स्कूल समोर, हिरानंदानी इस्टेट, पातलीपाडा, घोडबंदर रोड, ठाणे (प). या ठिकाणी व्हिला ग्रँड सोसायटीही १४ माळ्याची इमारत असून इमारतीच्या तळ मजल्यावरती असलेल्या मिटर बॉक्स रुममध्ये किरकोळ आग लागली होती. सदर घटनास्थळी महावितरण कर्मचारी, आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान यांनी आगीवर नियंत्रण मिळवले. सदर घटनास्थळी कोणालाही दुखापत नाही.आगीमध्ये मीटर बॉक्स रूम मधील एकूण-०१ मीटर बॉक्स व इलेक्ट्रिक वायरिंग जळाली आहे. मीटर बॉक्स रूममध्ये लागलेली आग स्थानिक रहिवाशी व अग्निशमन दलाचे जवान यांच्या मदतीने पूर्णपणे विझविण्यात आली आहे. परिस्थिती नियंत्रणात आणली.