सॅटीसवर प्रवाशांची गर्दी....बसचा थांगपत्ता नाही 

ठाणे परिवहनच्या मिनी बसमधील प्रवास ठाणेकरांना ठरतोय कसरतीचा ?

ठाणे : ठाणे परिवहन सेवेच्या ताफ्यात ८० इलेक्ट्रिक बसेसचा समावेश झाल्याने ठाणेकरांना गारेगार प्रवास मिळणार असा दावा करण्यात येत होता. मात्र ठाणे स्टेशन ते वागळे आगार या मार्गावर धावणाऱ्या मिनी बसेस मधून प्रवास करणाऱ्या ठाणेकरणा तारेवरच्या कसरतीचा ठरतो आहे. बसेसच्या अभावे प्रवाशांना सॅटिस स्टोपवर तासंतास बसची वाट पाहावी लागत आहे. तर सॅटीसवर असलेल्या नियंत्रक बसेसचे नियोजन करण्यात फेल झाल्याचे चित्र आहे. यामुळे प्रवाशांमध्ये आक्रोश आहे. 

ठाणे पालिकेच्या परिवहन सेवेत १२ मीटर आणि ९ मीटरच्या परिवहन बसेस रस्त्यावर धावताहेत. त्यात वातानुकूलित बसेस आणि तेजस्विनी बसेस यांचा समावेश आहे. या ९ मीटरच्या छोट्या बसेसची वेळेवर येत नसल्याने होणाऱ्या गर्दीमुळे वागळे आगार बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे चेंगराचेंगरीत हाल होत आहे. ठाण्याच्या घोडबंदर, उपवन, कोलशेत गाडीकडे जाणाऱ्या परिवहनच्या बसेसचे नियोजन दार १० ते १५  मिनीटांनी आहे. तर ठाणे स्टेशन ते वागळे आगार या बसेसचे नियोजन अर्ध्या तासाने किंवा त्यापेक्षाही जास्त काळ असल्याने प्रवाशांची दिवसभर बसस्टोपवर गर्दी पाहायला मिळते. सकाळी चाकरमानी, दुपारी कामानिमित्त जाणारा प्रवासी आणि शाळेचे, कॉलेजचे विद्यार्थी आणि संध्याकाळी कामावरून घरी परतणारे चाकरमानी, विद्यार्थी यांचा समावेश असतो. दरम्यान सॅटीस वरील बस नियंत्रक यांच्या बस नियोजनाच्या अभावाने वागळे  आगाराच्या मार्गावर धावणाऱ्या बसेस कमी आहेत. त्यात १२ मीटरच्या बसेस पेक्षा सर्वाधिक जास्त मिनी बसेस चालविण्यात येतात. त्यामुळे या बसमध्ये प्रवाशांची गर्दी होते. तर बसमधील पेसेजमध्ये एक प्रवाशी उभा राहिल्यास दुसऱ्याला जाण्यासाठी जागा नसल्याने धक्काबुक्की सारखे प्रकार घडतात. त्यातच मागून चढायचे आणि पुढून उतरायचे तसेच दोन्ही दरवाजे बंद असल्याने प्रवाशांना उकाड्याचाही त्रास सहन करावा लागतो. बस वाहक तिकीट फाडण्यासाठी मागे येईपर्यंत अनेक फुकटे उतरून निघून जात असलयाचे समोर आलेले आहे. यामुळे पुरुष आणि  विशेषतः महिला प्रवाशांमध्ये आक्रोश आहे. परिवहन सेवेने ठाणे स्थानक ते वागळे आगार मार्गावर बसेसची संख्या वाढवावी अशी मागणी प्रवाशी करीत आहेत.  

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

हिरानंदानी इस्टेटमध्ये मीटर बॉक्सला आग