दिवा भाजपच्या माजी महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश

दिव्यातील राजकीय समीकरणे बदलली....दिव्यात उबाटा मजबूत 

ठाणे : तन्वी फाउंडेशनच्या माध्यमातून दिवा शहरातील महिलांच्या प्रश्नांवर कायम आक्रमकपणे आवाज उठवणाऱ्या तसेच दिवा भाजपच्या महिला अध्यक्षा म्हणून मागील एक वर्षापासून सक्रिय काम करणाऱ्या ज्योती पाटील यांना पक्षाने पदावरून डावल्यानंतर त्यांनी अखेर ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली. यापूर्वी मुंडे यांनी उबाठा सेनेत प्रवेश केला होता. दिव्यात शिंदे सेनेला आता भाजपचे नाही तर उबाठा सेनेचे आव्हान राहणार आहे. 

शनिवारी दुपारी ज्योती पाटील यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केला. शिवसेनेचे नेते राजन विचारे, लोकसभा संपर्कप्रमुख खोत, ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, कल्याण जिल्हाप्रमुख सदानंद थरवळ यांच्या नेतृत्वाखाली शेकडो महिलांच्या उपस्थितीत ज्योती पाटील ठाकरेंच्या शिवसेनेची मशाल हाती घेतली. यावेळी दिवा शिवसेनेचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. ज्योती पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने पक्षाला अधिक बळकटी मिळेल अशी अपेक्षा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे कार्यकर्ते व्यक्त करत आहेत.दिवा शहरात पक्ष फुटी नंतर नेतृत्वाची पोकळी निर्माण झाली होती, ज्योती पाटील यांनी ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याने  कार्यकर्त्यात उत्साहाचे वातावरण आहे. दरम्यान अंतर्गत राजकारणाला कंटाळून ज्योती पाटील यांनी भाजपला राम राम ठोकल्याची चर्चा दिव्याच्या राजकीय वर्तुळात आहे.

दिव्यात राजकिय समीकरणात बदल...शिंदे सेनेला उबाठा सेनेचे आव्हान 

दिवा भाजपाला सर्वसामान्यतः नेणारी महिलांचे नेतृत्व ज्योती पाटील यांनी भाजपच्या तोंडबघ्या राजकारणाला कंटाळून उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेत प्रवेश केला. दिव्यात सुरुवातीला मनसेचा जोर होता. त्यानंतर भाजपने दिव्यात आपला पाय रोहिदास मुंडे आणि ज्योती पाटील यांच्या माध्यमातून रोवला. सेनेत फूट पडल्यानंतर दिव्यात मनसे  गायब झाली. शिंदे सेनाला केवळ मित्रपक्ष भाजपचे आव्हान होते. तर दुसरीकडे भाजप स्थानिक नेतृत्वाने रोहिदास मुंडेंना डिच्चू दिला. त्यानंतर एकमेव महिलांचे नेतृत्व करणाऱ्या तन्वी फाउंडेशनच्या ज्योती पाटील यांनाही भाजपने डिच्चू दिला. या दोघांनीच दिव्यात भाजपची ओळख करून दिली होती. मुंडे आणि पाटील यांनी उबाठा सेनेत प्रवेश केल्याने दिव्यात शिंदे सेनेला आता भाजपचे नाही तर उबाठा सेनेचे आव्हान ठरणार आहे. तर ज्योती पाटील यांच्या सोबत उबाठा सेनेत  दिवा मनसेच्या मयुरी पोरजी व तेजस पोरजी यांनीही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला.

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सॅटीसवर प्रवाशांची गर्दी....बसचा थांगपत्ता नाही