राज्य सहकारी गृह निर्माण संस्था फेडरेशनच्या अध्यक्षपदी सुहास पटवर्धन

सहकारी गृह निर्माण संस्था फेडरेशनचे नवे संचालक मंडळ

ठाणे :  महाराष्ट्र राज्य सहकारी गृह निर्माण संस्था फेडरेशन या राज्यस्तरीय संस्थेच्या अध्यक्षपदी सुहास पटवर्धन (पुणे) यांची अध्यक्ष पदी तर प्रकाश दरेकर (मुंबई) यांची उपाध्यक्ष पदी तर मानद सचिव पदी भास्कर म्हात्रे (नवी मुंबई) यांची बिनविरोध निवड झाली. सुहास पटवर्धन हे पुणे जिल्हा सहकारी गृह निर्माण संस्था आणि अपार्टमेंट महासंघाचे अध्यक्ष आहेत.

 २३ नोव्हेंबर रोजी ठाणे येथे संचालक मंडळाची निवडणूक सहायक निबंधक महेश कुमार गायकवाड (ठाणे जिल्हा) यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. गायकवाड यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले.  सीताराम राणे-ठाणे, संभाजी जाधव-कोल्हापूर, नंद कुमार काटे-सातारा, श्रीमती जयश्री मराठे-धुळे, प्रकाश रथकंटीवार-नागपूर, ॲड.वसंतराव तोरवणे-नाशिक हे संचालक या प्रसंगी उपस्थित होते. नूतन अध्यक्ष म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर सुहास पटवर्धन यांनी बिनविरोध अध्यक्षपदी निवड केल्याबद्दल सर्व संचालकांचे आभार मानले आणि संस्थेचा कार्य विस्तार राज्यव्यापी करण्यावर भर देत सर्व संचालकाच्या मदतीने हे कार्य आपण पुढे नेऊ असे नमूद केले. मावळते अध्यक्ष सीताराम राणे यांनी आजवर केलेल्या कार्याचा आढावा घेतला आणि जिल्हा स्तरावरील संस्थांना बळ देण्यासाठी प्रयत्नशील राहू, असे आश्वासित केले. नूतन उपाध्यक्ष प्रकाश दरेकर यांनी गृह निर्माण संस्थांसमोरील आव्हाने पेलण्यासाठी सतत प्रयत्नशील राहून कार्य करत राहू, असे सांगितले. मानद सचिव भास्कर म्हात्रे यांनी गृह निर्माण संस्थेच्या जिल्हास्तरीय पदाधिकारी यांना प्रशिक्षण देण्यासाठी नियोजन करण्यात येईल तसेच प्रशिक्षण साहित्य तयार करून कार्यवाही करण्याची मनीषा यावेळी व्यवत केली. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवा भाजपच्या माजी महिला अध्यक्षा ज्योती पाटील यांचा ठाकरेंच्या शिवसेनेत प्रवेश