नवी मुंबईत आता मैदान माफियाराज ?

नवी मुंबई शहरात आता मैदान माफियांचे  पेव

नवी मुंबई : आजवर आपण तेल माफिया,वाळू माफिया,डेब्रिज माफिया तसेच भू माफिया असे माफिया पाहिले असतील. मात्र नवी मुंबई शहरात आता मैदान माफियांचे  पेव फुटले असून त्यांच्या कडून सार्वजनिक  मैदाने परस्पर क्रिकेट अकादमी ना दिली जात आहेत.आणि या क्रिकेट अकादमी महिन्याला लाखोंची माया जमवत आहेत.

भारतात क्रिकेट प्रेम हे सर्वश्रुत असून आज लहानग्यांपासून ज्येष्ठांपर्यंत या खेळाची आवड तयार झाली आहे.त्यामुळे जितके क्रिकेट बघणारे आहेत तितकेच क्रिकेट खेळणारे आहेत.आणि शहरी भागात याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे क्रिकेट खेळात आपला ठसा उमटावा म्हणून हे खेळाडू योग्य  प्रशीक्षकाच्या मार्गदर्शना खाली प्रशिक्षण घेत असतात आणि क्रिकेटपटुंची हीच गरज लक्षात घेऊन आज जागाे जागी क्रिकेट अकादमिंचे पेव फुटले आहे. हे अकादमी चालक एका एका खेळाडू कडून दरमहा दोन ते तीन हजार दर आकारून प्रशिक्षण देत असल्याने दर महा लाखोंची माया जमवत आहेत. मात्र या अकादमीकडे नवी मुंबई महानगर पालिकेचा ना व्यवसाय परवाना आहे ना मालमत्ता विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र. त्यामुळे या ठिकाणी कुठला अपघात झाला तर कोण जबाबदार राहणार? मात्र हा सारा  खेळ स्थानिक मैदान माफियांच्या जोरावर चालत असून यात  काही शाळा संस्थांमधील शिक्षकांचा सहभाग आहे. मात्र हा सारा प्रकार मनपा अधिकाऱ्यांना  माहित असून त्यांनी डोळ्यावर हिरवी पट्टी बांधून धुतराष्ट्राची  भूमिका अवलंबली आहे.

शहरात महानगर पालिकेचे मैदान असो व खाजगी मैदान  त्या ठिकाणी एखादा व्यवसायिक वापर होत असेल तर महानगर पालिकेच्या आवश्यक परवानग्या घेतल्या पाहिजे. मात्र नवी मुंबई शहरात असे होताना दिसत नाही.अशी माहिती मनपा क्रीडा विभागाने दिली आहे.

शहरात महानगर पालिकेचे मैदान तसेच खाजगी मैदानात विना परवाना क्रिकेट अकादमी सुरू असतील तर त्याची चौकशी करून योग्य ती कार्यवाही केली जाईल. -  सोमनाथ पोटरे - उपायुक्त,अतिक्रमण व परिमंडळ १, नवी मुंबई महानगर पालिका.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सिडकोच्या भूखंडावर अनधिकृतपणे डेब्रीज टाकणा-या ५ डंपर सहित ९ इसमावर कारवाई