रहदारीच्या रस्त्यांची प्रक्रियाकृत पाण्याव्दारे स्वच्छता

हवा प्रदूषण रोखण्याकरिता महापालिका तर्फे पाऊल

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका द्वारे वायू गुणवत्ता निर्देशांकात सुधारणा करण्याच्या दृष्टीने महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या मार्गदर्शनानुसार विविध उपाययोजना राबविण्यात येत आहेत. यामध्ये महापालिकेकडे असलेल्या दोन धूळ नियंत्रक वाहनांव्दारे (ल्ेू एल्ज्जीोेग्दह न्नप्ग्म्त) नवी मुंबई शहरातील मुख्य रस्ते प्रक्रियाकृत पाणी वापरुन स्वच्छ केले जात असून, या वाहनातील स्प्रेयर प्रणालीव्दारे हवेतील धूलीकणांची सफाई केली जात आहे.

महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांच्या निर्देशानुसार २२ नोव्हेंबर रोजी वाशी रेल्वे स्टेशन ते छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथून डावीकडे सागर विहारपर्यंत आणि तेथून वळसा घालून पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत तेथून डावीकडे वळत कोपरखैरणेघणसोली नोड जंक्शनपर्यंत आणि तेथून वळसा घालून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे येऊन डावीकडे वळत वाशी मधील एपीएमसी मार्केट परिसरात साफसफाई करुन तेथून पुनः तुर्भे-वाशी मार्गाने छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत येऊन डावीकडे वळत वाशी रेल्वे स्टेशनपर्यंत रस्ते सफाई आणि धूलीकण स्वच्छता करण्यात आली.

याशिवाय ठाणे-बेलापूर मार्गावर तुर्भे उड्डाणपूलापासून सुरुवात करीत टी जंक्शन ऐरोली पर्यंत सरळ आणि तेथून डावीकडे वळत ऐरोली-मुलुंड खाडी पूलानजिक भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकापासून वळसा घालून दिवा कोळीवाडा चौक मार्गे टी जंक्शनपर्यंत आणि तेथून डावीकडे वळत दिघागाव रेल्वे स्टेशन पर्यंत ठाणे-बेलापूर रोडने सरळ जात तेथून वळसा घेऊन तुर्भे उड्डाण पूलापर्यंत सरळ रस्ते स्वच्छता करण्यात आली.

यापुढील काळातही नवी मुंबई शहरातील वाहने वर्दळीच्या विविध रस्त्यांची स्वच्छता अशीच सुरु राहणार असून, प्रक्रियाकृत पाण्याने रस्ते धुवून स्वच्छ केले जाणार आहेत. तसेच प्रक्रियाकृत पाण्याचे स्प्रेयर हवेत फवारुन हवेतील धुलीकणांवर नियंत्रण ठेवले जाणार आहे.

राष्ट्रीय शुध्द हवा कार्यक्रमांतर्गत शुध्द हवेच्या गुणवत्तेची मानके विहित मर्यादेत आणण्याकरिता पंधराव्या वित्त आयोगांतर्गत वायू गुणवत्ता सुधारणा करण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने दोन मल्टीपर्पज स्प्रेयर आणि डस्ट सप्रेशन व्हेईकल उपलब्ध करुन घेतली असून, याव्दारे हवा गुणवत्ता राखण्याकरिता पाण्याव्दारे रस्ते सफाई आणि हवेत उडणाऱ्या पाण्याच्या फवाऱ्यांव्दारे धुलीकण प्रतिबंध केला जात आहे. यामध्ये वापरले जाणारे पाणी सी-टेक मलप्रक्रिया केंद्रातून शुध्दीकरण केले जाणारे प्रक्रियाकृत पाणी असल्याने यामुळे पाण्याव्दारे रस्ते स्वच्छतेचा उद्देश साध्य होत आहे. याशिवाय पिण्याच्या पाण्याची बचतही केली जात आहे, असे महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी सांगितले.

नवी मुंबई महापालिका हवा गुणवत्ता निर्दशांकात सुधारणा करण्यासाठी विविध उपाययोजना करीत असून, नवी मुंबईकर नागरिकांनीही वायू प्रदुषण रोखण्याकरीता नवी मुंबई महापालिकेस संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका आयुक्त राजेश नार्वेकर यांनी केले आहे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

ठाणे महापालिकेच्या अर्थसंकल्प आखणीमध्ये आता नागरिकांचाही सहभाग