तृतीय पंथीयांच्या जमातीत घुसखोरी

खऱ्या तृतीय पंथीयांच्या उत्पन्नावर गदा

वाशी : तृतीय पंथीयांना सहानभुतीच्या भिकेवर मिळणाऱ्या उत्पन्नावर आता काही जणांची नजर पडली आहे. यासाठी काही पुरुष तृतीय पंथीयांचा वेश परिधान करुन जागो-जागी भिक मागत फिरत आहेत. त्यामुळे तृतीय पंथीयांच्या जमातीत घुसखोरी केल्याने खऱ्या तृतीय पंथीयांच्या उत्पन्नावर परिणाम होऊन त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न जटील बनला आहे.

जगात  स्त्री आणि पुरुष असे दोन माननीय घटक असले तरी तृतीय पंथीय नामक तिसरा घटक देखील आपले जीवन व्यतीत करत असतो. भारतात तृतीय पंथियांना एक वेगळ्याच नजरेतून पाहिले जाते. त्यामुळे सामाजिक जीवनात त्यांना त्यांच्या मूलभूत गरजा भागवताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. परिणामी आजही तृतीय पंथीय रस्त्यावरील सिग्नलवर भिक मांगुन किंवा एखाद्या शुभ कार्यात मिळणाऱ्या बिदागीवर आपले जीवन व्यतीत करतात. त्यामुळे तृतीय पंथियांना समाजातून मिळणारी सहानभुती पाहता काही सामाजिक तत्वांनी याचा गैरफायदा घेण्यास सुरुवात केली आहे. यासाठी काही पुरुष तृतीय पंथीयांचा वेश परिधान करुन जागो-जागी भिक मागत फिरत आहेत. तर काही जण स्वतःहून लिंग बदल करुन वेश्या व्यवसाय तसेच अंमली पदार्थ विक्री करताना रस्त्यात दिसत असतात. मात्र, त्यांच्या या कृत्याने खऱ्या तृतीय पंथीयांची जमात बदनाम तर होतेच शिवाय, उत्पन्नावर परिणाम होऊन त्यांच्या उदरनिर्वाहचा प्रश्न जटील बनला आहे. बनावट तृतीय पंथीय फिरत असल्याचा प्रकार २१ नोव्हेंबर रोजी मुंबई मध्ये समोर आला आणि खऱ्या तृतीय पंथीयांनी बनावट तृतीय पंथीयांना पकडून चांगलाच चोप दिला.

तृतीय पंथियांना समाजातून मिळणारी सहानभुती पाहता काही असामाजिक तत्वे तृतीय पंथियांचा वेश परिधान करुन भिक मांगतात. तसेच काहीजण गैरकृत्ये देखील करतात. बनावट तृतीय पंथियांच्या गैरकृत्याने खऱ्या तृतीय पंथियांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय खऱ्या तृतीय पंथियांच्या उदारनिर्वाहाचा प्रश्न देखील निर्माण झाला आहे. त्यामुळे बनावट तृतीय पंथीयांवर पोलिसांनी कारवाई करण्याची गरज आहे. - हिना शेख, तृतीय पंथीय - महापे. 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

एपीएमसी शौचालय घोटाळा प्रकरणी तीन अधिकारी निलंबित