‘एमआयडीसी'च्या जागेवर अवैध झोपड्यांचे पेव

बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात

वाशी  : नवी मुंबईतील ‘एमआयडीसी'च्या जागेत असलेल्या अनधिकृत झोपडी धारकांना एसआरए योजना लागू होणार आहे. त्यासाठी बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात देखील करण्यात आली आहे. त्यामुळे नवी मुंबईतील  झोपडी धारकांना अधिकृत घरे भेटणार असल्याने या भागात आता आणखी अवैध झोपड्या उभारण्याचे काम तेजीत सुरु असून, यात दिघा विभाग आघाडीवर आहे.

राज्यात नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यासाठी शासनाने नवी मुंबईतील भूमिपुत्रांची १९६५ साली ‘एमआयडीसी'च्या माध्यमातून  २३३३ हेक्टर जमीन संपादित केली. त्यानंतर या ठिकाणी ४००० लहान-मोठे कारखाने उभे राहिले. मात्र, ‘एमआयडीसी'ने जितकी जमीन संपादित केली होती तेवढा वापर न केल्याने कालांतराने या जमिनींवर झोपडपट्ट्या उभ्या राहिल्या. आज या झोपड्यांनी  सुमारे १३० हेक्टरच्या  वर जागा व्यापली आहे.

मात्र, आता या झोपडपट्टी भागात एसआरए अंतर्गत विकास केला जाणार आहे. त्यासाठी चिंचपाडा भागात बायोमेट्रिक सर्वेक्षणाला सुरुवात करण्यात आली आहे. झोपड्या अधिकृत होऊन घरे भेटणार असल्याचे पाहून या भागात आता आणखी नवीन झोपड्या बांधण्याचे सत्र सुरु झाले आहे. यात दिघा विभाग आघाडीवर आहे. मात्र, एमआयडीसी प्रशासन अवैध झोपड्यांकडे दुर्लक्ष करीत असल्याने करोडो रुपयांची जमीन आज झोपडीधारकांच्या घश्यात जात आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

तृतीय पंथीयांच्या जमातीत घुसखोरी