घणसोली येथे सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सभा

मराठ्यांना मिळालेल्या आरक्षणाची माहिती कोणी लपवली, त्या नेत्याचे नाव जाहीर करा - मनोज जरांगे पाटील

नवी मुंबई : १९६७ सालीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले असताना याची माहिती दडवून ठेवत या आरक्षणावर कोण आडव आले त्याच नाव जाहीर करा असा इशारा देत मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी व्यापक लढा उभारला आहे.याचाच एक भाग म्हणून सोमवारी नवी मुंबईतील घणसोली येथे त्यांची सकल मराठा व मराठा क्रांती मोर्चा च्या वतीने सभा आयोजित केली होती.यावेळी पाटील यांनी वरील इशारा दिला.

२००१ साली मराठा आरक्षणासाठी जारी केलेल्या कायद्यात थातुरमातुर सुधारणा करून आपल्या समोर हा सुधारित कायदा तीन वेळा आणला गेला.मात्र यात मराठा समाजाचं नुकसान असल्याने आपण हा कायदा नाकारला . हैद्राबाद येथील कुणबी नोंदी सापडत आहेत.मात्र त्या उर्दू भाषेत असल्याने याबाबत शासनाकडे सविस्तर मागणी केली.आता अकरा हजार नोंदी मिळाल्याचे समितीने जाहीर केले आहे.मात्र प्रत्यक्षात दीड लाख नोंदी सापडल्या आहेत. वेळ आल्यास याविषयी माहिती जनतेसमोर ठेवेल असे जाहीर करत जरांगे पाटील यांनी आरपार भूमिका घेण्याचा मानस व्यक्त केला आहे. अन्न पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांच्यावर अप्रत्यक्ष तोंडसुख मिश्किल शैलीत त्यांनी घेतले.आपण सरकारचे प्रतिनिधी आहात मंत्री असल्याने जातीयतेचे राजकारण करू नये असा सल्ला दिला.मुंबई दौरा करताना मंत्रालय कसे आहे,विमान कधी उडतात,हे सर्व बघायचे असे जाहीर करत त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिल्याने मानले जात आहे.मराठा समाजाने मतभेद टाळावे ,आरक्षण मिळाल्यावर काय राजकारण करायचे ते करा.असे बजावत छगन भुजबळ यांच्यावर नाव न घेता टोले लगवत आक्रमक शैलीत देखील त्यांचा समाचार घेतला.त्यांनी आपल्याला नेते शत्रू मानत आहेत.त्यांना शत्रू मानू द्या.मी स्वतःहून कोणावर टीका केली नाही पण आरक्षणावर कोणी आला तर त्याला सुट्टीच नाही असा सज्जड इशारा त्यांनी दिल्यावर उपस्थित जनतेत एकच जल्लोष करण्यात आला.आरक्षण मिळाल्यावर आपला विजय झाला असे समजू मात्र जर आरक्षण नाही मिळाले तर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करू असा इशारा सरकारला दिला आहे.आरक्षण मिळाले की मुक्ती घेईल असेही जाहीर करत ओबीसी आरक्षण मिळायला लागलं तर वाद निर्माण केले जात आहेत. मात्र कोणतेही डाव यशस्वी होऊ द्यायचे नाही.ही जबाबदारी आता मराठा समाजावर आहे. जे नेते वादाची ठिणगी पाडू पाहत आहेत त्यांनी एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे त्यांचे वय किती,अनुभव किती हे ओळखून काम केलं पाहिजे असा सवाल करत मी येडपट आहे माझ्या नादाला नको लागु असेही आपल्या ग्रामीण शैलीत त्यांनी सांगितले.आरक्षण अंतिम टप्प्यात असल्याने आता राग अपमान पचवा, असा सल्ला उपस्थितांना देत त्यांनी मराठे एक येत नाही. असे बोलणाऱ्यानी घणसोली मधील उपस्थितीची गर्दी बघावी असे आव्हान केले.घणसोली येथील संभाजी महाराज मैदानातील या सभेला महिला देखील मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.महविकास आघाडीच्या नेत्यांच्या समवेत एकनाथ शिंदे शिवसेना गटातील स्थानिक पदाधिकारी या सभेला उपस्थित होते. सभास्थानी येण्यापूर्वी मनोज जरंगे पाटील यांनी माथाडी भवनात दिवंगत माथाडी कामगार नेते आमदार अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करत अण्णासाहेब पाटील यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

सरकारच्या टेबलावर मराठा आरक्षणाचीच फाईल

सरकारच्या टेबलावर आता फक्त मराठा आरक्षणाचीच फाईल. त्यामुळे या दरम्यान कोणी कितीही उसकले तरी मराठा समाजाने शांत राहिले पाहिजे.कुठेही जातीय  दंगल घडता  कामा नये. तसेच २४ डिसेंबर पर्यंत प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू ठेवा. कोणी कितीही रोखले तरी येत्या २४ डिसेंबर पर्यंत आरक्षण मिळणारच पण नाही मिळाले तर पुढील लढ्याची दिशा त्याच दिवशी जाहीर करू असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला.

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

‘एमआयडीसी'च्या जागेवर अवैध झोपड्यांचे पेव