डिसेंबर अखेर ‘टीएमटी'च्या तापयात नवीन ४३ इलेक्ट्रिक बस

जानेवारी २०२४ पासून ‘टीएमटी'चे उत्पन्न होणार ३० लाखांवर 

ठाणे : ठाणे महापालिका परिवहन सेवेला हळूहळू आर्थिक झळाळी मिळत आहे. तर डिसेंबर अखेरीस उर्वरित ४३ नवीन इलेक्ट्रिक बसेसचा समावेश झाल्यानंतर ठाणे परिवहन उपक्रमाचे २५ ते २६ लाखांवर अडकलेले प्रतिदिनाचे उत्पन्न जानेवारी, २०२४ या वर्षांपासून ३० लाखाच्या आसपास जाणार असल्याची माहिती ठाणे परिवहन सुत्रांनी दिली. तर आतापर्यंत परिवहनच्या तापयात केवळ नवीन इलेक्ट्रिक ८० बसेसचा ताफा समाविष्ट झालेला आहे. त्यामुळे परिवहनच्या उत्पन्नात प्रतिदिन २ लाखाचे उत्पन्न वाढ झालेली आहे. अन उर्वरित ४३ बसेसचा ‘टीएमटी'च्या समावेश झाल्यास पुन्हा उत्पन्नात वाढ होऊन परिवहनचे उत्पन्न ३० लाखाच्या आसपास पोहोचणार आहे.

सध्याच्या घडीला ठाणे परिवहन उपक्रमाच्या सेवेत ठाणेकरांच्या सुखकर प्रवासासाठी विविध रुटवर धावणाऱ्या परिवहनच्या ‘टीएमटी' बसेसची संख्या ४८७ च्या आसपास आहे. यात नव्या इलेक्ट्रिक बसेसचा समावेश आहे. नव्या बसेसद्वारे प्रतिदिन ९० हजाराचे उत्पन्न एका बसमधून परिवहन सेवेला मिळत आहे. ‘टीएमटी'ला इलेक्ट्रिक १२३ बसेस मिळणार आहेत. त्यात आतापर्यंत ८० नवीन इलेक्ट्रिक बसेस मिळाल्या असून त्या विविध मार्गांवर धावत आहेत. तर उर्वरित ४३ बसेस या देखील नवीन वर्षांपूर्वीच परिवहनच्या सेवेत समाविष्ट होणार आहेत. तर त्यामुळे ‘टीएमटी'च्या उत्पन्नात लाखोंची वाढ होणार असलायची माहिती ठाणे परिवहन उपक्रमाचे व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.

४३ बसेसची प्रतिक्षा...
ठाणे परिवहन उपक्रमाच्या सेवेतील अपुऱ्या बसेसच्या संख्येमुळे परिवहन सेवा ठाणेकरांना सुखकर प्रवास देण्यास असमर्थ ठरत होती. दरम्यान, १२३ नवीन इलेक्ट्रिक बसेसचा समावेश होणार असल्याने ‘टीएमटी' दमदार स्थितीत येणार आहे. आतापर्यंत टप्प्याटप्प्याने ठाणे परिवहन सेवेच्या तापयात आजपर्यंत तब्बल ८० नवीन इलेक्ट्रिक बसेसचा समावेश झालेला आहे. यामध्ये १२ मीटरच्या आणि ९ मीटरच्या बसेसचा समावेश आहे. तर परिवहन सेवा सक्षमतेच्या दिशेने वाटचाल करीत असून नवीन ८० बसेसमुळे परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नात प्रतिदिन २ लाखाची भर पडलेली आहे. आता प्रतिक्षा उर्वरित ४३ नव्या बसेसची त्यामुळे नवीन वर्षात ‘टीएमटी'चे उत्पन्न प्रतिदिन ३० लाखाच्या आसपास जाणार आहे

नवीन वर्षात १२३ इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर...
येत्या नवीन वर्षापूर्वी ‘टीएमटी'च्या सेवेत उर्वरित ४३ बसेसचा समावेश होणार आहे. त्याचप्रमाणे ‘टीएमटी'च्या निर्धारित १२३ बसेसचा कोटा पूर्ण होणार आहे. सदर १२३ इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावल्यानंतर परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नातही किमान तीन लाखाच्या आसपास वाढ होणार आहे. परिणामी, ‘टीएमटी'चे प्रतिदिनाचे उत्पन्न ३० लाखाच्या घरात जाणार आहे. आतापर्यंत ८० बसेस आलेले आहेत, तर उर्वरित ४३ बसेस ३ डिसेंबर अखेर पर्यंत परिवहन ताब्यात समाविष्ट होतील, अशी माहिती ठाणे परिवहन व्यवस्थापक भालचंद्र बेहेरे यांनी दिली.

प्रदुषण करणाऱ्या डिझेल बसेस काढणार निकालात...
८० नवीन कोऱ्या प्रदुषणमुक्त इलेक्ट्रिक बसेस या सध्या रस्तयावर धावत आहेत. तर ‘टीएमटी'च्या सेवेत टप्प्याटप्प्याने समाविष्ट होणाऱ्या इलेक्ट्रिक बसेस नंतर प्रदुषण करणाऱ्या डिझेल आणि खर्चिक बसेस निकाली काढणार असल्याने याचा मोठा फायदा ठाण्यामध्ये प्रदुषण नियंत्रण ठेवण्यात ठाणे महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला फायद्याचे ठरणार आहे. नवीन वर्षात १२३ नव्या गाड्यांचे उद्दिष्ट पूर्ण झाल्यानंतर जुन्या धूर ओकणाऱ्या खर्चिक डिझेल बसेस या निकाली काढण्यात येणार असलयाचे परिवहन व्यवस्थापक बेहेरे यांनी सांगितले.

इलेक्ट्रीक बसेसमुळे प्रदुषण कमी होण्यास हातभार लागत आहे. या बसेसमुळे प्रदुषण करणाऱ्या खर्चिक बसेस रस्त्यावर येणार नाहीत. डिसेंबर अखेर उर्वरित ४३ बसेस येणार आहेत. त्यामुळे परिवहन उपक्रमाच्या उत्पन्नात वाढ झाली असून ती आणखीन वाढणार आहे. शिवाय नवीन बसेसमुळे प्रदुषण रोखण्यासाठी मदत देखील होणार आहे.  - भालचंद्र बेहेर, व्यवस्थापक - ठाणे महापालिका परिवहन उपक्रम. 

 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल-मेडिकल कॉलेजचे मे महिन्यात भूमीपुजन