शासकीय रक्तपेढी येथे रक्तदान मोहीम सुरु

जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप यांचा रक्तदान करुन मोहिमेत सहभाग

ठाणे :  ठाणे, मुंबई शहरामध्ये गरजु रुग्णांना रक्ताचा तुटवडा भासत असल्याने सध्या रक्ताची गरज भासत आहे. त्याअनुषंगाने रक्तदान मोहीम १७ नोव्हेंबर रोजी रक्तपेढी विभाग (ब्लड बँक), सिव्हील रुग्णालय, ठाणे येथे सुरु झाली असून आवश्यक रक्तसाठा होईपर्यंत सदर मोहीम दररोज सुरु राहणार आहे.

जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप यांनी रक्तदान करुन या मोहिमेत सहभाग दर्शविला. यावेळी शासकीय रुग्णालयातील शासकीय रक्तपेढीचे रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, डॉ. स्मिती आडे, डॉ. सायली लखोटे, डॉ. योगेश बडक, वरिष्ठ नर्स शीला भंडारे, टेक्निशियन सुजाता होले, गायकवाड, ज्येष्ठ पत्रकार रामकृष्णन अय्यर, जिल्हा माहिती कार्यालयातील वाहन चालक राजू भोये उपस्थित होते.

रक्तदान केल्यानंतर रक्तसंक्रमण अधिकारी डॉ. गिरीश चौधरी, डॉ. स्मिती आडे यांच्या हस्ते जिल्हा माहिती अधीकारी सानप यांना प्रशस्तिपत्र आणि रक्तदाता नोंदणी कार्ड देवून सन्मानित करण्यात आले.

या रक्तदान मोहिमेत जास्तीत जास्त शासकीय अधिकारी-कर्मचाऱ्यांनी तसेच नागरिकांनी, युवक-युवतींनी स्वेच्छेने रक्तदान करण्यास पुढाकार घ्यावा आणि गरजू रुग्णांना मदत करुन  या सामाजिक व राष्ट्रीय कार्यात मोलाचे योगदान द्यावे, असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी मनोज शिवाजी सानप आणि जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांनी केले आहे. 

 

Read Previous

बाजारात उच्चप्रतिच्या कांद्याची आवक घटली

Read Next

दिवाळी संपली तरी ‘आनंदाचा शिधा'ची प्रतिक्षा